Colon Cancer Symptoms | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि या बदलत्या जीवनशैलीचा त्यांच्या शरीरावर मात्र विपरीत परिणाम होत आहे. यामुळे बद्धकोष्ठते सारख्या अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. अनेक लोक हे बाहेरचे अन्न जास्त खातात. त्यामुळे त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास चालू होतो. हे एक कोलन कॅन्सरचे (Colon Cancer Symptoms) लक्षण असू शकते. जर तुम्हाला सतत बद्धकोष्ठता होत असेल, तर याला कोलन कॅन्सर म्हणजे मोठ्या आतड्याचा कर्करोग असे म्हणतात.
हा कॅन्सर मोठ्या आतड्यात किंवा गुद्दभागाच्या आतड्या (Colon Cancer Symptoms) संबंधित असतो. सुरुवातीला याची काही लक्षण दिसतात. परंतु लोक सुरुवातीला या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. परंतु नंतर हीच लक्षणे आपल्या जीवासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे या लक्षणांना वेळीच ओळखले पाहिजे. आणि डॉक्टरांचे उपचार सुरू केले पाहिजे. आता या कॅन्सरची कोणती लक्षणे दिसतात? तसेच याचे काय परिणाम होतात हे आपण जाणून घेऊया.
जर तुम्ही नेहमीच बाहेर जंक फूड खात असेल, तर तुम्हाला हा कोलन कॅन्सर (Colon Cancer Symptoms) होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे बाहेरील पदार्थांचे कमीत कमी सेवन करा. तुम्ही जर जंकफुड जास्त प्रमाणात खाल्ले, तर तुम्हाला बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल. तसेच तुम्ही जास्त प्रमाणात मांस देखील सेवन करत असाल, तरी देखील कोलन कॅन्सर होण्याची शक्यता तुम्हाला जास्त भीती असते. तुम्ही जर सतत चीज, बटर यांसारख्या गोष्टीचे सेवन करत असाल तरी देखील सुरुवातीला बद्धकोष्ठतेपासून येथे सुरुवात होते. परंतु हळूहळू हा आजार कर्करोगामध्ये रूपांतरित होतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या लोकांना दारू आणि सिगरेटचे व्यसन आहे. त्यांना याचा धोका जास्त असतो. त्यामुळे या रोगाची लक्षणे वेळीच ओळखणे गरजेचे असते. आणि त्यानुसार त्यावर उपचार घेणे गरजेचे आहे.