Colors Marathi : मतदानाच्या पार्श्वभूमीवर कलर्स मराठीने बदलला लोगो; प्रेक्षकांना केले ‘हे’ आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Colors Marathi) छोट्या पडद्यावर कलर्स मराठी ही अत्यंत लोकप्रिय वाहिनी आहे. कलर्स मराठीवरील जवळपास प्रत्येक मालिका प्रेक्षकांच्या घराघरात पाहिली जाते. प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्याच्या हेतूने कलर्स मराठी ही वाहिनी कायम प्रयत्नशील असते. विविध आशयाच्या, विविध ढंगाच्या आणि विविध कथानकाच्या बऱ्याच मालिका कलर्स मराठीवर सुरु आहेत. त्यामुळे गेल्या काही काळात कलर्स मराठीचा प्रेक्षकवर्ग वाढताना दिसला आहे. दरम्यान, सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहत असताना कलर्स मराठीने आपला लोगो बदलून आपल्या प्रेक्षक वर्गाला एक आवाहन केलं आहे.

कलर्स मराठीने बदलला लोगो (Colors Marathi)

कलर्स मराठी या लाडक्या लोकप्रिय वाहिनीने नुकताच आपल्या सोशल मीडिया हॅण्डल्स इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब लोगोमध्ये एक विशेष बदल केलेला दिसत आहे. या बदललेल्या नव्या लोगोमध्ये एका बोटावर शाई लागलेली दिसतेय. ज्यामुळे मत दिल्याचे सूचित होत आहे. मागील काही वर्षात मतदानाचा टक्का फार कमी झाला आहे. या नव्या लोगोच्या बदलामुळे लोकांमध्ये मतदानाचे महत्त्व आणि एक स्थिर देशासाठी त्याची आवश्यकता याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा कलर्स मराठीचा उद्देश आहे.

प्रेक्षकांना केले ‘हे’ आवाहन

कलर्स मराठीने नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक कार्यात आपले योगदान दिले आहे. नुकतेच कलर्स मराठीच्या कलाकारांनी इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवरून विविध व्हिडिओंद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. (Colors Marathi) मतदान करण्यासाठी बाहेर या, वोटिंग करणे हा तुमचा हक्क आणि जबाबदारी आहे. देशासाठी एक पाऊल उचलून मतदान करा. आपल्या एका मताने देशाचे कल्याण होईल. मतदार हे टीव्ही आणि सोशल मीडियाचा वापर अधिक प्रमाणात करतात, हीच गोष्ट लक्षात घेऊन कलर्स मराठीने हे स्तुत्य पाऊल उचलले आहे.

कलर्स मराठीने केलेला हा बदल प्रेक्षकांना मतदान करण्याची प्रेरणा देईल आणि त्यांना मतदान करण्यासाठी नक्कीच प्रवृत्त करेल. कारण मतदान हीच आपली ताकद, हीच आपली जबाबदारी! कलर्स मराठीने अत्यंत अनोख्या पद्धतीने आपल्या प्रेक्षक वर्गाला मतदार होऊन आपला हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. (Colors Marathi) या कृतीचे सर्व स्तरावरून विशेष कौतुक केले जात आहे.