हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | साताऱ्यातील शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसातील सभेला द्विवर्षपूर्ती झाल्याने कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडणारे व कठिण समयी जिद्दीने लढा देवून यश मिळाल्याचे पहायला मिळत आहे. काही तासात हा व्हिडिओला लाखो लोकांनी पहायला आहे. परंतु 18 आॅक्टोबर 2019 रोजी सायंकाळी झालेल्या सभेने सातारा जिल्हाच नव्हे राज्यात राष्ट्रवादीला अनपेक्षित यश मिळवून दिले होते.
सातारा येथे विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणूक लागली होती. छ. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी पक्षातून सहा महिन्यापूर्वी निवडून आल्यानंतर राजीनामा देवून भाजपामधून तिकीट घेवून उभे राहिले होते. तर पुन्हा एकदा शरद पवार यांचे शालेयमित्र श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीतून तिकीट देण्यात आले होते. भाजप पक्ष छ. उदयनराजे भोसले यांच्या मदतीने खासदारकी आणेल अशी शक्यता वर्तविली जात होती.
आदरणीय Sharad Pawar साहेब साताऱ्यातील तुमची ही सभा जिद्दीने लढण्याची आणि प्रतिकूल परिस्थितीतही यश खेचून आणण्यासाठी अखंड संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहील!
#द्विवर्षपूर्ती
#सातारासभा
सातारा येथे नरेंद्र मोदी तर कराडला अमित शहा यांची सभा झालेली होती. सातारा लोकसभेची जागा राखणे हे राष्ट्रवादी पक्ष व शरद पवार यांच्यासाठी तसेच भाजपासाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनलेली होती. अशावेळी राष्ट्रवादी पक्षाची सातारा जिल्हाच नव्हे तर राज्यातून अनेकांनी साथ सोडली होती. त्यामुळे अशावेळी सातारची पावसातल्या सभेने एक अनपेक्षित असा इतिहास निर्माण केला. या पावसातल्या सभेला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आ. रोहीत पवार यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.