आ. विनायक मेटे यांच्या बैठकीत धिंगाणा घालणाऱ्यावर गुन्हे दाखल

0
32
vinayak mete
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घुसून कार्यकर्त्यांना मारहाण केल्या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास मस्के, किसन घनवट, नवनाथ मुळे, राहुल यलदी, सचिन घनवट व इतर एकावर ही कारवाई करण्यात आली. ही घटना पडेगाव येथील ईश्वर रुग्णालय येथे 24 जून रोजी घडली.

विशेष म्हणजे आरोपींनी मारहाण करून गळ्यातील तीन तोळे वजनाची सोनसाखळी देखील तोडून नेल्याचा आरोप तक्रारीत आहे. अभिमन्यू माकणे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 24 जून रोजी पडेगावमधील ईश्वर रुग्णालयामध्ये आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत शहर मेळावा तसेच मराठा आरक्षणाची बैठक घेण्यात आली होती. बैठक सुरू असतानाच राहुल सचिन यांनी बैठकीत धिंगाणा घातला. त्यांना बाहेर काढले असताना त्यांनी बाहेर जाऊन म्हस्के व इतर यांना सोबत घेत पुन्हा कार्यक्रमात बळजबरीने प्रवेश केला. त्यानंतर मेटे यांच्या अंगावर धावून जात बुक्क्यांनी मारहाण केल्याचे माकणे यांनी म्हटले आहे.

घटनेनंतर मेटे यांनी पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांची भेट घेतली. छावणी पोलिस ठाण्यात जमाव जमल्याने त्यानंतर उपायुक्त निकेश खाटमोडे सहाय्यक आयुक्त विवेक सराफ यांनी धाव घेतली त्यानंतर मागणी यांच्या फिर्यादीवरून सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here