सत्तांत्तर 21-0 : खंडाळा कारखान्यात आ. मकरंद पाटील यांच्याकडून परिवर्तन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खंडाळा | तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या म्हावशी येथील खंडाळा तालुका शेतकरी सह.साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये बाळसिध्दनाथ संस्थापक पँनेलचे शंकरराव गाढवे यांच्या नेतृत्वाखाली असणा-या पँनेलला आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास सहकारी परिवर्तन पँनेलने धोबीपछाड देत संत्तातर केले. सत्ताधारी संस्थापक पॅनेलचा 21 – 0 ने धुव्वा उडाविला.

बाळसिध्दनाथ संस्थापक पॅनल व शेतकरी विकास परिवर्तन पॅनलमध्ये सत्तासंघर्ष शिगेला पोहचला होता. यामध्ये परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकत सत्ताधारी बाळसिध्दनाथ संस्थापक पॅनलचा धुव्वा उडवला. किसरनवीर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले व विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई होती. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी महाविकास आघाडी घटक पक्षाच्या मदतीने लढाई जिंकली.

कारखान्याच्या निवडणूकीत दोन्ही पॅनलने प्रतिष्ठेची लढाई केली होती. त्यामुळे प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर देण्यात आला होता . यामध्ये विशेषतः संस्थापक शंकरराव गाढवेसह चिरंजीव अनिरुध्द उर्फ संजीव गाढवे, खंडाळा पंचायत समिती सदस्य चंद्रकांत यादव यांच्यासह अनेक मातब्बरांना पराभवाचा सामना करावा लागला.

या निवडणूकीत ऊस उत्पादक गट क्र. १ मध्ये परिवर्तन पॅनलचे चंद्रकांत ढमाळ -३३९० मते , दत्तानाना ढमाळ – ३४४५ मते , अशोकराव गाढवे – ३३५८ मते तर संस्थापक पॅनलचे शंकरराव गाढवे – २५४३ मते , अशोकराव ढमाळ – २२२४ मते , रविंद्र ढमाळ – २१९९ मते तर अपक्ष संतोष देशमुख यांना ७७ मते मिळाली.

गट २ मध्ये परिवर्तन पॅनलचे नितीन भरगुडे पाटील, अनंत ऊर्फ राजेंद्र तांबे, विष्णू तळेकर विजयी झाले, तर संस्थापक पॅनलचे चंद्रकांत यादव, संजय पानसरे, साहेबराव महांगरे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

गट क्र .३ मध्ये परिवर्तन पॅनलचे विश्वनाथ पवार, रमेश धायगुडे, किसन धायगुडे विजयी झाले, तर संस्थापक पॅनलचे नारायणराव पवार, विशाल धायगुडे, संजय गायकवाड यांना पराभवाचा सामना करावा लागला मिळाली.

गट क्र . ४ मध्ये परिवर्तन पॅनलचे ज्ञानेश्वर भोसले,, हणमंतराव भोसले, साहेबराव कदम विजयी झाले. तर संस्थापक पॅनलचे मोहनराव भोसले, मनोज पवार, श्रीपाद देशपांडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. . गट क्र .५ मध्ये परिवर्तन पॅनलचे किसनराव ननावरे, धनाजी अहिरेकर, शिवाजीराव शेळके पाटील विजयी झाले. तर संस्थापक पॅनलचे पुरुषोत्तम हिंगमिरे, प्रदीप क्षीरसागर, बापूराव धायगुडे यांना पराभवाचा सामना करावा लागला

महिला राखीव मध्ये परिवर्तन पॅनलच्या शालिनी पवार शोभा नेवसे, इतर मागास प्रतिनिधीमध्ये परिवर्तन पॅनलचे सुरेश रासकर, भटक्या विमुक्त जाती प्रतिनिधी मध्ये परिवर्तन पॅनलचे विठ्ठल धायगुडे, अनुसुचित जाती प्रतिनिधी मध्ये परिवर्तन पॅनलचे रत्नकांत भोसले हे विजयी झाले. संस्था गट प्रतिनिधी मध्ये परिवर्तन पॅनलचे गजानन धुमाळ – ८२६ मते , तर संस्थापक पॅनलचे संजीव ऊर्फ अनिरुध्द गाढवे – ३६९ मते मिळाली.

Leave a Comment