कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील राजकीय सामाजिक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अँड उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी केले. कोयना सहकारी दूध संघाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने रयत संघटना व कॉंग्रेस कार्यकर्ते यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी चंद्र प्रकाशात दुग्धपानाच्या आस्वाद बरोबर व्याख्याते गणेश शिंदे यांचे विचार ऐकत प्रबोधनाची कोजागिरी साजरी केली. यानिमित्ताने कराड तालुक्यातील कार्यकर्त्यांची सांघिक विचाराची देवाण- घेवाण ही झाली. तालुक्यातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट ठरले.
खोडशी (कराड) येथील कोयना संघावर प्रतिवर्षी प्रमाणे कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी सुरू केली होती. कोरोना व काकांच्या निधनामुळे दोन वर्षे खंड पडला होता. आज त्याच उत्साहात उदयदादा यांच्या प्रमुख उपस्थिती त कोजागरी साजरी झाली. माजी सभापती आप्पासाहेब गरुड, कोयना दूध संघाचे चेअरमन वसंतराव जगदाळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन रंगराव थोरात,मलकपूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे, अजित पाटील- चिखलीकर,कराड कॉग्रेस चे अध्यक्ष प्रदीप जाधव, माजी जि प सदस्य निवासराव थोरात,अविनाश नलवडे,जयवंतराव जगताप,शहाजीराव देशमुख,यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदयसिंह पाटील म्हणाले, आज कराड तालुक्यात मार्गदर्शन करणारी जुनी मंडळी आपल्यात नाहीत, आशा स्थितीत कराड तालुक्याची आचार विचाराची घडी पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. कोजागिरीच्या पौर्णिमेचे निमित्त साधून तालुक्यातील कार्यकर्ते एकत्र आले आहेत. ग्रामीण माणूस, शेतकरी यांच्या प्रगती साठी सहकार चळवळ टिकली पाहिजे. सहकारातील ऊस कारखानदारी आज आपण यशस्वी करून दाखवला आहे. सांघिक जोरावर काकांनी नाहिरे वर्गाचे नेतूत्व केले हे करताना सामान्य माणसांना सत्तेत बसवले. यापुढेही काकांनी दिलेले विचार घेऊन आपण चालणार आहोत. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी संघटना मजबूत करावी असे आवाहन त्यांनी केले.
माजी प्राचार्य गणपतराव कणसे, प्रा.धनाजीराव काटकर, शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मोहनराव माने, सुदाम दिक्षित,दुर्गेश मोहिते, उमेश साळूखे, सपंतराव इंगवले, बाबुराव धोकटे, हणमंतराव चव्हाण, रयत कारखान्याचे संचालक प्रदीप पाटील, सुदाम चव्हाण, रमेश जगदाळे यासह तालुक्यातील कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाअधिकारी उपस्थित होते. स्वागत संचालक शिवाजीराव जाधव- दुशेरेकर यांनी केले. प्रास्ताविक व्यावस्थापकीय संचालक अमोल गायकवाड यांनी केले. शेवटी आभार वसंतराव जगदाळे यांनी मानले.
कोयना दूध संघावर कोजागिरी निमित्त जमलेली कार्यकर्त्या ची मांदियाळी
सहकाराशिवाय पर्याय नाही. आर्थिक परिस्थिती जर सुधारायची असेल आणि ग्रामीण भागाचा शाश्वत विकास करायचा असेल तर सहकार्याशिवाय पर्याय नाही. सहकार समृद्ध करता येईल का? यासाठी लोकनेते स्वर्गीय विलासराव पाटील- उंडाळकर यांनी विशेष प्रयत्न करून सर्वसामान्यांना सहकाराच्या माध्यमातून सत्तेची संधी दिली. अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांच्या स्मृती जतन करत असताना आपण सर्वांनी सहकार जपणे आवश्यक असून उद्योजकता, व्यावसायिकता व समाज प्रबोधन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या दिलखुलास व्याख्यानाने उपस्थित श्रोत्यांची मने महाराष्ट्राचे थोर व्याख्याते गणेश शिंदे यांनी जिंकली.