हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अंमली पदार्थ विरोधी पथकाने कॉमेडीयन भारती सिंहच्या घरावर शनिवारी छापा टाकला. त्यावेळी तिच्या घरात अंमली पदार्थ अढळून आल्यामुळे एनसीबीने शनिवारी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाने अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. आता त्या दोघांना मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयाने १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.
Bharti Singh, her husband sent to judicial custody till Dec 4
Read @ANI Story | https://t.co/uA8NJDy5EJ pic.twitter.com/W2NNllLbj1
— ANI Digital (@ani_digital) November 22, 2020
घरात गांजा सापडल्यानंतर दोघांनाही प्रथम एनसीबीने ताब्यात घेतले. चौकशीनंतर भारती सिंह हिला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी एक ड्रग पॅडलरला पकडण्यात आले. त्याच्या चौकशीनंतर भारती आणि हर्षच्या घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात दोघांच्या घरात 86.5 ग्रॅम गांजा सापडला. या जप्तीनंतर दोघांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आले.
चौकशीत भारतीने अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. आता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कोण आहे भारती सिंह?
भारती सिंह ही स्टॅण्डअप कॉमेडियन आणि अभिनेत्री आहे. सध्या ती ‘द कपिल शर्मा शो’मध्ये काम करत आहे. भारतीने 2017 मध्ये लेखक हर्ष लिंबचियासोबत लग्न केलं. तिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात ‘इंडियन लाफ्टर चॅलेन्ज’मधून केली होती. यानंतर तिने अनेक कॉमेडी शोमध्ये काम केला. यामध्ये कॉमेडी सर्कस, कॉमेडी सर्कस महासंग्राम, कॉमेडी सर्कस का जादू, कहानी कॉमेडी सर्कस की आणि कॉमेडी नाईट्स बचाओ यांचा समावेश आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’