सोलापूर प्रतिनिधी l कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या सोलापुरातुन एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील अवघ्या 22 दिवसाच्या एका चिमुकलीने कोरोनवर मात केली आहे. 26 एप्रिल रोजी या मुलीचा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात जन्म झाला होता. घरी गेल्यानंतर बाधितांच्या संपर्कात आल्याने या चिमुकलीची आई आणि चिमकुलीस कोरोनाची लागण झाली. अवघ्या 11 दिवसाची असताना या मुलीस शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र योग्य उपचार मिळाल्याने 11 व्या दिवशी चिमुकली कोरोनामुक्त झाली.
22 दिवसाची ही चिमकुली आणि तिची आई या दोघींचेही अहवाल निगेटिव्ह आल्याने रविवारी त्यांना रुग्णालयातुन सोडण्यात आले आहे. ही चिमुकली कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज पर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबधित रुग्णांची संख्या 390 वर जावून पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अजून भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. संचारबंदीमुळे जिल्ह्यात सर्वत्र शांतता आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.