दिलासादायक! सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या 50 च्या आत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने शहरातील नागरिकांना दिलासा मिळत आहे. शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या 40 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्याचबरोबर 3 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 16 आणि ग्रामीण भागातील 45 जण घरी परतले. सध्या 606 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

शहरातील मनपा हद्दीतील घाटी 1, दिल्ली गेट पेट्रोल पंप 1, देवळाई 1,सातारा परिसर 1, राधास्वामी कॉलनी 1, उल्कानगरी 1, एन 1, छत्रपतीनगर 1, समर्थनगर 1, बीड बायपास 1, म्हाडा कॉलनी 1, अन्य 3 रुग्ण आढळून आले. त्याचबरोबर ग्रामीण भागात फुलंब्री तालुक्यात 1, गंगापूर तालुक्यात 4, कन्नड तालुक्यात 7, वैजापूर तालुक्यात 3, पैठण तालुक्यात 3,
सिल्लोड तालुक्यात 1, सोयगाव तालुक्यात 1, आणि अन्य 3 रुग्ण आढळले आहे.

जिल्ह्यात 1 लाख 46 हजार 374 कोरोना बाधितांवर उपचार पूर्ण झाल्याने कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आजपर्यंत 3 हजार 437 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 606 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर फुलंब्री तालुक्यातील 65 वर्षीय महिला, कन्नड तालुक्यातील जावळी येथील 56 वर्षीय महिला आणि खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील 70 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला.

Leave a Comment