औरंगाबाद : शहरापासून जवळच 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभेफळ गावात सद्यस्थितीला एकही कोरोना रुग्ण नाही. म्हणून या गावच कौतुक पंचक्रोशीत केले जात आहे. शहराच्या जवळ असल्याने येथे कोरोना संसर्गाचा अधिक धोका होता. परंतु योग्य प्रतिबंधत्मक उपाययोजना करून गाव कोरोनामुक्त झाले, यापुढेही राहील, असा विश्वास कुंभेफळच्या सरपंच कांताबाई मुळे यांनी व्यक्त केला.
विभागीय आयुक्त कार्यलयात व्हिडीओ कॉन्फरनसिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरपंचाशी सवांद साधला. यात मुळे सहभागी झाल्या होत्या. कुंभेफळची लोकसंख्या नऊ हजार आहे. मागील महिन्यात गावात जवळपास 90 कोरोना रुग्ण होते. परंतु 45 वर्षाहून अधिक नागरिकांच्या तपासण्या, लसीकरण, वैद्यकीय सल्ल्यानुसार, ग्रामस्थांमध्ये आवश्यक औषधी वाटप, करून कोरोनावर मात करण्यात यश मिळाले.
बाहेर गावावरून गावात आलेल्या व्यक्तींचे विलीगीकरण त्यांच्या शेतात व जिल्हा परिषदेच्या शाळा, महाविद्यालयात केले. त्यांच्या राहण्याची,जेवणाची व्यवस्था ग्रामपंचायतामार्फत करण्यात आली.ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली.ग्रामपंचायतीतर्फे बांधण्यात स्वतंत्र असे 40 खाटांचे वीलगीकरण कक्ष स्थापन केले.गरजूना अन्नधान्याचे वाटप केल्याची माहिती मुळे यांनी दिली.