….तर तो संघ विजयासाठी पात्र नाही; संजय मांजरेकर भडकले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई विरुद्ध हातातील सामना गमावल्या नंतर क्रिकेट कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांनी हैदराबादच्या संघावर संताप व्यक्त केला आहे. हैदराबाद ने अंतिम 11 मध्ये तब्बल 4 खेळाडुंमध्ये बदल केला होता. यावर संजय मांजरेकर यांनी बोट ठेवले. हा संघ विजयासाठी पात्र नाही असे संजय मांजरेकर यांनी म्हंटल.

मुंबईविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने चार बदल केले. त्यांनी संघात अभिषेक शर्मा, विराट सिंह आणि मुजीब उर रेहमान आणि खलील अहमद या खेळाडूंचा केला. मांजरेकर म्हणाले, ”मला माफ करा, परंतु जर एखाद्या संघाने अभिषेक शर्मा, विराट सिंह आणि अब्दुल समद या तीन खेळाडूंना अंतिम अकरामध्ये एकत्र निवडले, तर तो संघ विजयासाठी पात्र नाही.

दरम्यान मुंबई विरुद्ध हैदराबादच्या सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी करून देखील मध्यक्रम गडगडल्या नंतर हैदराबादला पराभव स्वीकारावा लागला. हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव ठरला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like