पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद
महाबळेश्वर नगरपालिकेत नगराध्यक्षा स्वप्नीली शिंदे याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मार्च व एप्रिल महिन्याच्या सभा नियमबाह्य असून या सभेमध्ये घेण्यात आलेले सर्व ठराव रद्द करण्याचा निर्णय पुणे विभागीय आयुक्त यांनी दिला आहे. पुणे आयुक्तांच्या या निर्णयाने नगरपालिकेत खळबळ उडाली आहे. मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी याच्याकडे मार्च व एप्रिल महिन्यांतील सर्वसाधारण सभा व तहकूब सभा या पुरेशा कोरम अभावी नियमबाह्य असल्याबातचे पत्र जिल्हाधिकारी सातारा यांना पाठवले होते. महाबळेश्वर नगरपालिकेच्या 11 नगरसेवकांनी मार्च महीन्यात घेण्यात येणारी सभेचे विषय नगरपालिकेला आर्थिक तोटा व व्यक्तिगत फायद्याचे असल्याने 84 ठराव रद्द करुन सभा रद्द करण्याकरीता जिल्हाधिकारी सातारा याच्याकडे तक्रार केली होती.
जिल्हाअधिकारी सातारा यांनी केलेल्या सखोल चैाकशीनतंर जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी मुख्याधिकारी महाबळेश्वर यांना मार्च व एप्रिल महीन्यात झालेल्या सभेच्या ठरावाची अमंलबजावणी तूर्त रद्द करण्यात यावी असे पत्र दिले होते. मात्र जिल्हाधिकारी सातारा यांनी 30 दिवसात यांवर अतिंम निर्णय न घेतल्याने तसेच आयुक्तांनी 40 दिवसात निर्णय न दिल्याने कुमार शिंदे व त्याचे सहकारी नगरसेवक यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र न्यायालयाने सर्व प्रकरणात आयुक्ताना 9 ॲागस्ट पर्यंत अतिंम निर्णय देण्याचा आदेश बजावला होता. पुणे आयुक्त सैारभ राव यांनी महाबळेश्वर नगरपालिकेची मार्च व एप्रिल महीन्यात घेण्यात आलेली सभा नियमबाह्य असल्याचा निर्णय दिला आहे.
महाबळेश्वर नगरपालिकेत गत काही दिवसापासून नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व नगरसेवक कुमार शिंदे याच्या हम करसो भूमिकेच्या विरोधात उपनगराध्यक्ष अफजल सुतार याच्यासह 11 नगरसेवकांनी पुकारलेल्या बंडाला आयुक्ताच्या निर्णयाने बळकटी आली आहे. नगरपालीकेचे आर्थिक नुकसान व तोटा करुन स्वार्थी भूमीका घेणाऱ्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व कुमार शिंदे यांना आयुक्ताच्या निर्णयाने चपराक बसलेली आहे. महाबळेश्वर नगरपालिकेचे राजकारण गत काही दिवसांपूर्वी उपनराध्यक्ष अफजल सुतार, नगरसेवक प्रकाश पाटील, नगरसेवक किसनशेठ शिंदे यांच्यासारखे जुन्या – जाणत्या नगरसेवकांनी एकाधिकारशाही विरोधात 11 नगरसेवकांची मोट बाधली आहे.