लॉकडाऊनमध्ये कर्तव्यसह सामाजिक भान असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी त्यांचे कर्तव्य उत्कृष्टपणे बजावले आहे. यामध्ये कर्तव्य बजावत असताना काही गरजूंची मदत करताना अनेक पोलीस दलातील जवान दिसले. अश्याच पोलीस कर्मचाऱ्याचा आज पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सत्कार केला.

सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रकाश सुखदेव भालेराव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भालेराव यांनी लॉकडाऊनमध्ये तब्बल 25 कुटुंबाना मदत केली. यावेळी भालेराव यांच्या मित्रपरिवार व सहकर्मचारी यांना देखील साथ दिली असे भालेराव यांनी सांगितले.

दरम्यान, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी त्यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार केला. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा सत्कार पोलीस दलाच्या क्राइम मिटींगमध्ये झाला

Leave a Comment