नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेल (Petrol-Diesel Price) वरील टॅक्स कमी करण्याच्या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी सांगितले की, भारतात इंधनाचे दर वाढविणे तात्पुरते आहे, परंतु हळूहळू ते खाली आणले जातील. केंद्रीय मंत्री म्हणाले की,”देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती विक्रमी उच्चांपर्यंत पोहोचण्यामागे आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. लवकरच ते दर खाली येण्याचे आश्वासन त्यांनी दिले. प्रधान म्हणाले की,”आंतरराष्ट्रीय इंधनाच्या किंमती वाढल्यामुळे भारतालाही इंधनाचे दर वाढवावे लागले पण हे तात्पुरते आहे. हळूहळू याच्या किंमती कमी होईल.”
केंद्र आणि राज्य दोन्ही टॅक्स आकारतात
या महिन्याच्या सुरूवातीस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले होते कि,”यावर राज्य आणि केंद्राने चर्चा केली पाहिजे कारण पेट्रोलियम दरावरील शुल्क केवळ केंद्राकडे नाही आहे तर राज्येही त्यावरील शुल्क आकारत आहेत. त्यांनी पुढे स्पष्टीकरण दिले की, जेव्हा केंद्राला महसूल मिळतो तेव्हा त्यातील 41% राज्यांकडे जातात.
किंमत कमी करण्याबाबत चर्चा
टॅक्स कोणत्या प्रमाणात कमी करता येईल यावर सरकार चर्चा करीत आहे. केंद्र आणि सरकार एकत्रित काम कसे करावे यावर मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. सर्वसामान्यांना वाढत्या किंमतींपासून दिलासा मिळू शकतो.
आतापर्यंत किती महाग झाले आहे?
फेब्रुवारी महिन्यात पेट्रोलच्या किंमतीत सलग 16 दिवस वाढ झाली आहे. यामुळे, हे 04.74 रुपयांनी महाग झाले आहे, मुंबईत पेट्रोल 97.57 वर पोहोचले आहे, जे मेट्रो शहरांमध्ये सर्वाधिक आहे. यासह, जवळजवळ सर्व शहरांमध्ये पेट्रोल All Time High Price वर गेले आहे. यावर्षी फक्त जानेवारी आणि फेब्रुवारीबद्दल बोललो तर गेल्या 25 दिवसांत पेट्रोल 7.36 रुपयांनी महाग झाले आहे.
15 व्या दिवशीही किंमती स्थिर
सर्वसामान्यांना सध्या पेट्रोल दरवाढीपासून मुक्तता मिळाली आहे. सलग 15 व्या दिवसाला इंधन दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज पेट्रोलची किंमत 91.17 रुपये आणि डिझेलच्या किंमती प्रति लिटर 81.47 रुपये आहेत. 27 फेब्रुवारीपासून पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.