राष्ट्रकुल स्पर्धेआधी भारताला मोठा धक्का ! ‘या’ दोन महिला अ‍ॅथलिट्स उत्तेजक चाचणीत दोषी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 28 जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा पार (commonwealth game) पडणार आहेत. या ठिकाणी 72 देशांतील जवळपास 4 हजार 500 खेळाडू खेळताना दिसणार आहेत. भारतातून जवळपास 230 खेळाडूंचा सहभाग असलेला चमू बर्मिंगहॅमला जाणार आहे. या स्पर्धेला काही दिवस शिल्लक असताना भारताला मोठा धक्का बसला आहे. या स्पर्धेत पदकाच्या प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या दोन महिला अ‍ॅथलिट्स उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (commonwealth game) सहभागी होता येणार नाही. हा भारताला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. पदकांच्या प्रबळ दावेदार असलेल्या धावपटू एस. धनलक्ष्मी आणि तिहेरी उडीमध्ये राष्ट्रीय विक्रम नावावर असलेली ऐश्वर्या बाबू या दोघीजणी उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळळ्या आहेत. जागतिक अ‍ॅथलेटिक्सच्या अ‍ॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने घेतलेल्या चाचणीत स्टेरॉइड्स सेवन केल्याचे आढळून आले.

एस. धनलक्ष्मी आणि ऐश्वर्या बाबू यांची कामगिरी
एस धनलक्ष्मी शंभर मीटर आणि चार बाय शंभर मीटरमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार होती. युजीने येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी देखील ती भारतीय संघात होती. मात्र व्हिसाच्या समस्यमुळे ती या स्पर्धेला जाऊ शकली नव्हती. धनलक्ष्मी 26 जून रोजी कोसानोव्ह मेमोरियल अ‍ॅथलेटिक्स मीटमध्ये 200 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तसेच गेल्या महिन्यात चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपदरम्यान राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी ऐश्वर्या बाबूचे नमुने घेतले होते. त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ऐश्वर्यानं चेन्नईमधील स्पर्धेत तिहेरी उडी मारून राष्ट्रीय विक्रम केला होता. कोणत्याही भारतीय खेळाडूची ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. यापूर्वी अंजू बॉबी जॉर्जने 6.83 मीटर लांब उडी मारली होती.

स्पर्धा कधी आणि कोठे होणार ?
28 जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा (commonwealth game) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. या ठिकाणी 72 देशांतील जवळपास 4 हजार 500 खेळाडू खेळताना दिसणार आहेत. भारतातून देखील जवळपास 230 खेळाडूंचा सहभाग असलेला चमू बर्मिंगहॅमला जाणार आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!

IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार

‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

Leave a Comment