कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! मिळू शकेल 10 टक्के पगारवाढ; फ्रेशर्स लोकांनाही संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली। देशातील कोरोनाव्हायरसच्या दुसर्‍या लाटेत लोकांमध्ये लॉकडाऊन आणि नोकरीबाबत तणाव कायम आहे. अशा परिस्थितीत,जीनियस कन्सल्टंट्स या स्टाफिंग कंपनीच्या सर्वेक्षणात नोकरी शोधनाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या सर्वेक्षण अहवालानुसार कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांचे पगार वाढवण्याच्या मूडमध्ये आहेत. ही वाढ 5 ते 10 टक्क्यांपर्यंत असू शकते. बहुतेक नोकरदार लोकांच्या पगाराच्या रचनेत बदल होऊ शकतो. जीनियस कन्सल्टंट्सच्या सर्वेक्षणात देशभरातील 1200 कंपन्यांचा समावेश होता. त्यापैकी निम्म्याहून अधिक कंपनी आपल्या कर्मचार्‍यांचे वेतन वाढविण्याच्या बाजूने आहे.

59% कंपन्यांनी सांगितले की ते कर्मचार्‍यांचे पगार वाढवण्याच्या मूडमध्ये आहेत. या सर्वेक्षणात 20 टक्के कंपनीचे म्हणणे आहे की ते वेतन वाढवतील पण ते 5% पेक्षा कमी असेल. तर 21% कंपन्या 2021 मध्ये पगार वाढवणार नाहीत. 43 टक्के कंपन्या फ्रेशर्सना संधी देण्याची इच्छा असल्याचे सांगतात. त्याचबरोबर, 41 टक्के कंपन्यांची अनुभवी कर्मचारी घेण्याची योजना आहे. एचआर, आयटी, आयटीईएस, बीपीओ, बँकिंग अँड फायनान्स, बांधकाम व अभियांत्रिकी, शिक्षण, लॉजिस्टिक हॉस्पिटॅलिटी, मीडिया, फार्मा, मेडिकल, पॉवर अँड एनर्जी, रिअल इस्टेट या कंपन्यांचा समावेश या सर्वेक्षणात जिनिअस कन्सल्टंट्सनी भाग घेतला.

कंपन्यांनी बजेट वाढवले:

आर्थिक क्रियाकलापातील अपेक्षेपेक्षा वेगवान सुधारणा, ग्राहकांचा आत्मविश्वास वाढणे आणि चांगले मार्जिन यामुळे कंपन्यांनी त्यांचे पगार वाढीचे बजेट वाढवले आहे. निकालांनुसार 20 टक्के कंपन्यांनी यावर्षी पगार दुप्पट वाढवण्याची योजना आखली आहे, तर 2020 मध्ये हा आकडा केवळ 12 टक्के होता. म्हणून नोकरी शोधणार्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. आणि फ्रेशर्ससाठी तर ही मोठी आनंदाची बातमी आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group