केंद्र सरकारच्या पिकविमा योजनेतील कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसविले : राजू शेट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी झालेले आहेत. केंद्र सरकारच्या पुढाकाराने ज्या पिकविमा कंपन्या जे हप्ते घेत होते. गेल्या दोन वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती आल्या, त्यामुळे या पिकविम्याच्या कंपन्या कर्जबाजारी होवून दिवाळखोरीत निघाल्या पाहिजे होत्या. परंतु झालं भलतचं त्याच कंपन्यांनी हजारो कोटीचा नफा कमवला. तेव्हा यांचा अर्थ त्यांनी सरळसरळ कंपन्यांना फसविलेले आहे. या बाबतचे पुरावेही आम्ही वेळोवेळी दिलेले आहेत. परंतु केंद्राच्या धोरणामुळे महागाई वाढली यावर चर्चा व्हायला नको म्हणून राजकीय भोंगे वाजत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खा. राजू शेट्टी यांनी केली आहे.

कराड येथे ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे राजू शेट्टी म्हणाले, आज केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरलेले आहे. महागाईचा आगडोंब जो उसळलेला आहे, त्यावर नियंत्रण आणण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलेले आहे. आज अनेक वस्तूच्या किंमती वाढलेल्या आहेत, त्याला केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे. राज्य आणि केंद्र सरकारचे अपयश यांच्यावर चर्चा नको म्हणून राजकीय भोंगे वाजत आहेत.

राज्य सरकारवरही टीकास्त्र

केंद्र सरकार सोबत राज्य सरकारही अपयशी ठरताना दिसते. राज्य सरकारच्या काळात कोरोनामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. अनेक मंत्र्यासाठी कोट्यावधीचा खर्च करण्यात आला, हे अपयश राज्य सरकारचे आहे, असे म्हणत राज्य सरकारवरही राजू शेट्टी यांनी टीकास्त्र सोडले.

Leave a Comment