ट्रकमालकाच्या अपघाती मृत्युबद्दल रुपये १ कोटी १५ लाखांची भरपाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | मुंबईकडून पुण्याकडे येत असताना जुन्या हायवेवर विरुध्द दिशेने आलेल्या दुस-या ट्रकचा टायर फुटून नियंत्रण जाऊन समोरुन जोराची धडक दिल्याने चालकांचा जागीच मृत्यु झाला होता. कंटेनर ट्रक चालक – मालक संजय सखाराम पवार (रा.परखंदी. ता. माण, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्याचे नांव आहे. सदर अपघाती मृत्युबद्दल नुकसान भरपाई मिळावी, यासाठी संजय यांची पत्नी, तीन मुले व आई यांनी सातारा न्यायालयात दाद मागितली होती. सातारा जिल्हा न्यायालयाने नुकताच निर्णय दिला असून १ कोटी १५ लाख इतकी इतिहासातील सर्वोच्च नुकसान भरपाई देण्याचा आदेश सातारा जिल्हयाच्या न्यायालयीने दिला असल्याची माहिती अर्जदारातर्फे काम पाहिलेले ॲड. राजेंद्र वीर यांनी दिली.

कंटेनर ट्रक चालक – मालक संजय सखाराम पवार (रा.परखंदी. ता. माण, जि. सातारा) हे स्वतःचा ट्रक चालवीत मुंबईकडून पुण्याकडे येत होते. जुन्या हायवेवर विरुध्द दिशेने आलेल्या दुस-या ट्रकचा टायर फुटून नियंत्रण जाऊन समोरुन जोराची धडक दिली होती. त्यामध्ये संजय यांचा जागीच मृत्यु झाला होता. सदर अपघाती मृत्युबद्दल नुकसान भरपाई मिळावी, यासाठी संजय यांची पत्नी, तीन मुले व आई यांनी सातारा न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने अपघाती इन्शुरन्स क्लेमच्या कामी सातारा जिल्हा न्यायालयाने नुकताच निर्णय दिला. आदेशात संजय यांचे वारसांना समोरच्या ट्रकच्या मालकाकडून व विमा कंपनीकडून रुपये ८१ लाख तसेच ७ टक्के दराने व्याज, अशी एकूण रुपये १ कोटी १५ लाख इतकी भरपाई देण्याचा आदेश सातारा जिल्हयाच्या न्यायालयीने दिला आहे.

सदर कामी संजय याचे वारसांतर्फे सदर नुकसान भरपाईचे दाव्याचे काम पाहिलेले ॲड. राजेंद्र वीर यांनी सांगितले की, सदर संजय यांनी सन २००८ साली १० चाकी कंटेनर ट्रक फायनान्स कंपनीच्या कर्जाने विकत घेतला होता. सदर अपघात होईपर्यंत संजय यांनी दरमहा रुपये ३५,०००/- इतका हप्ता वेळच्या वेळी फेडला होता. तसेच सदर संजय यांचे कुटूंब कळंबोली, मुंबई येथे भाड्याच्या घरात राहत होते व संजय यांची मुले तेथेच शिक्षण घेत होती. या सर्व बाबींचा विचार करून संजय यांचे उत्पन्न दरमहा रुपये ६६ हजार इतके होत असल्याने एकूण रुपये १ कोटी ४४ लाख नुकसान भरपाई मिळण्याची मागणी अर्जदारा तर्फे करण्यात आली होती. सदर क्लेमच्या कामी सदर कंटेनर ट्रकच्या कर्ज खात्याचा उतारा ट्रकच्या मालकीचे आर.टी.ओ. चे दाखले इत्यादी कागदपत्रे दाखल करण्यात आली होती. सदर पुरावा व सर्वोच्च न्यायालयाचे व मुंबई उच्च न्यायालयाचे विविध न्यायनिर्णय यांचा विचार करून सातारा येथील जिल्हा न्यायाधीश पी. पी. अभंग, यानी अंतिम निर्णय देवून अर्जदारांना वरील प्रमाणे एकूण १ कोटी १५ लाख इतकी नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. सदरची नुकसान भरपाई ट्रक चालक-मालकाच्या अपघाती मृत्यु बद्दलच्या आज पर्यंतच्या सातारा जिल्हा न्यायालयाच्या इतिहासातील सर्वोच्च नुकसान भरपाई ठरली आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group