हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना काळात देशातील सर्व डॉक्टर जिवाची बाजी लावून काम करत असताना त्याच डॉक्टरांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी हास्य कलाकार सुनील पाल यांच्याविरोधात अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टर्स देवदूत नाहीत राक्षस आहेत अस वादग्रस्त वक्तव्य सुनील पाल यांनी केले.
डॉक्टर रुग्णांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच स्टँडअप कॉमेडियन सुनील पाल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये त्यांनी डॉक्टरांना राक्षस म्हटलं आहे. त्यामुळे सुनील पाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. डॉक्टरांविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर असोसिएट ऑफ मेडिकल कन्सल्टंट्सच्या अध्यक्षा डॉक्टर सुष्मिता भटनागर यांनी तक्रार दाखल केली आहे.
काही दिवसांपूर्वी सुनीलनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओद्वारे त्यानं देशातील सद्य परिस्थितीवर भाष्य केलं होतं. देशातील 90 टक्के डॉक्टर्स चोर आहेत. दे कोरोनाग्रस्त परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. गरीबांनाकडून लाखो रुपये उकळत आहेत. साधं पाच रुपयांचं औषध 100 रुपयांना देखील विकत आहेत.” असे सुनील पाल यांनी म्हंटल होत.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.