फडणवीसांविरोधात 3 वर्षांपूर्वीच ईडीकडे तक्रार, मात्र अद्याप चौकशीला बोलावलं नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडी ने अटक केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय सूडबुद्धीने मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली असा आरोप महाविकास आघाडी कडून करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. फडणवीस यांच्या विरोधात 3 वर्षांपूर्वीच ईडीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्याप चौकशीला बोलवण्यात आले नाही अस म्हणत ED कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय? असा सवाल त्यांनी केला.

4 सप्टेबर 2019 म्हणजे 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मोहनिश जबलपुरे यांनी ॲक्सिस बँक नुकसानीचा सप्रमाण लेखाजोखा ED कडे सादर केला त्याचा हा पुरावा. या तीन वर्षात दोघांपैकी एकालाही ED ने बोलावले नाही. ED कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय?

दरम्यान, डी गॅंग संबंधित व्यक्तींशी जमीन व्यवहार केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्या वर करण्यात आला असून कोर्टाने त्याना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली आहे. भाजपकडून सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांना अडचणीत आणण्याच प्रयत्न सुरू आहे असा आरोप महाविकास आघाडी कडून करण्यात येत आहे.

Leave a Comment