मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी ऍड.गुणरत्न सदावर्ते विरोधात पोलिसात तक्रार.

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद | माध्यमावरील चर्चे दरम्यान याचिका कर्ते विनोद पाटील यांच्याशी संवाद साधताना ऍड.गुणरत्न सदावर्ते यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करीत मराठा समाजाच्या वतीने आज पोलीस आयुक्ताकडे कारवाईच्या मागणीसाठी तक्रार दिली.

मराठा समाजाच्या आरक्षण विषयावर एका माध्यमावर चर्चा सुरू होती. चर्चे मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून याचिका दाखल करणारं याचिका कर्ता विनोद पाटील हे देखील चर्चेत सामील होते.दरम्यान ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी माजूरे असा शब्द प्रयोग केला.

यामुळे सकल सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करीत ऍड.गुणरत्ने यांच्या विरोधात त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी आज पोलीस आयुक्तांना मराठा बांधवांच्या वतीने तक्रार अर्ज देण्यात आला. तक्रारींवर ऍड.शिवाजी इंजे पाटील, रवींद्र जाधव, अमोल झळके,अरुण शेळके, संदीप जोगस,केदार वरकड यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.

 

https://www.facebook.com/aurangabadnewslive/videos/464246267971594/