SBI ग्राहकांसाठी महत्वाची माहिती ! ‘हे’ नंबर कोणाबरोबरही करु नका शेअर, अन्यथा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर आपल्याकडेही देशातील सर्वात मोठी सरकारी असलेल्या बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. बँकेने आपल्या सर्व ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. एसबीआयने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अ‍ॅप डाउनलोड करण्याबाबत सतर्क केले आहे. त्यांच्या ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे.

एसबीआयने म्हटले आहे की, बँक खाते क्रमांक, नेट बँकिंग पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर, जन्मतारीख, सीव्हीव्ही नंबर, डेबिट कार्ड नंबर, वैयक्तिक ओळख तपशील इत्यादी कोणाशीही शेअर करू नये. हा इशारा देताना एसबीआयने ग्राहकांना काही सूचनाही दिल्या आहेत, ज्या त्यांनी पाळायला सांगितल्या आहेत. याशिवाय नकळत मेलमध्ये आलेल्या कुठल्याही अटॅचमेंट्स, एसएमएस आणि कॉलबाबत बँकेने सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे.

बँक वेळोवेळी अलर्ट जारी करते
देशातील सर्वात मोठी बँक ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सतत सतर्कतेचा इशारा देत असते. ग्राहकांच्या पैशाचे रक्षण करणे हा एसबीआयचा उद्देश आहे. बँक आपल्या ट्विटर हँडल आणि एमएमएसद्वारे ग्राहकांना अलर्ट पाठवते.

बँकिंग फ्रॉडची प्रकरणे सतत वाढत आहेत
लॉकडाऊन दरम्यान बँकिंग फसवणूकीच्या घटना वाढल्या आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालानुसार 2018-19 मध्ये डिजिटल व्यवहारांमुळे बँकिंगची 71,543 कोटी रुपयांची फसवणूक झाली. या काळात बँकांमधील फसवणूकीची 6800 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदली गेली. सन 2017-18 मध्ये बँकेच्या फसवणूकीची 5916 प्रकरणे नोंदली गेली. त्यापैकी 41,167 कोटींपेक्षा जास्त फसवणूक झाली. गेल्या 11 आर्थिक वर्षात बँकेच्या फसवणूकीची एकूण 53,334 प्रकरणे नोंदविली गेली आहेत, तर 2.05 लाख कोटी रुपयांची फसवणूक त्यांच्यामार्फत झाली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment