कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कोरोनाच्या संकट काळात लोकांना धान्य मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी शासन स्वस्त धान्य दुकानाच्यामाध्यमातून हे धान्य पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र या स्वस्त धान्य दुकान चालकांनी संकटकाळात सर्वच नियमांना हरताळ फासला आहे. याबाबतचा एकप्रकार सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील ओंडमध्ये समोर आला आहे.
लाॅकडाऊनमुळ लोकांच उत्पन्न थांबल आहे. त्यात लोकांची अडचण होऊ नये म्हणून शासनाने स्वस्त धान्य दुकानांच्यामाध्यमातून लोकांपर्यंत कमी दरात धान्य पोहचावे म्हणून योजना आखल्या आहेत, मात्र या संकटात लोकांची फसवणूक करून स्वस्त धान्य दुकानदार फायदा घेत असल्याचंसमोर येत आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील ओंड येथील विकास सेवा सोसायटी क्रमांक 2 यांच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या स्वस्त धान्य दुकानातून लोकांना पावती देण्यात येत नसल्याच उघडकीस आले आहे. त्यामुळे नेमकं धान्य किती रूपयाला विकले जात आहे हेच लोकांना कळत नाही, पावती देत नसल्याबाबत स्वतः दुकानातील कर्मचारीच कबुली देत आहे.
तर धान्य किती आले आहे. किती लोकांना द्यायचा आहे याबाबत माहिती देणारा कोणताही फलक लावण्यात येत नाही. सध्या लाॅकडाऊनमुळे सोशल डिस्टसिंग पाळावं अस आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी नियमही करण्यात आले आहेत, मात्र ओंडच्या या दुकानचालकांनी तेही पाळण्याची तसदी घेतली नाही, दुकानासमोर लोकांनी किती अंतरावर उभं राहवं यासाठी चिन्ह नाहीत. या दुकानचालकांवर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारयांकडे तक्रार केली आहे.
सध्या लोकांना या धान्याची खूप गरज आहे. अनेक गोरगरिबांना या दुकानांचाच आधार आहे, मात्र अनेक दुकानदार गर्दीत काळा पैसा चालवून स्वतः चे खिसे भरत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/244614643475875/
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”