हे काम पूर्ण न केल्यास गॅस सिलेंडरवर मिळणारे अनुदान होईल बंद; केंद्र सरकारचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकारच्या माध्यमातून उज्वला योजनेचे (Ujwala Yojana) ग्राहक आणि एलपीजी गॅसचे (LPG Gas) ग्राहक यांना अनुदान देण्यात येते. हे अनुदान केंद्र सरकार प्रति सिलेंडर देत असते. या अनुदानाची राशी योजनेची जोडलेल्या ग्राहकांच्या खात्यात थेट पाठवली जाते. मात्र आता सरकारने उज्वला योजनेसह एलपीजी गॅस जोडणीच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता गॅस ग्राहकांना गॅस एजन्सीमध्ये जाऊन बायोमेट्रिकची प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे असणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्या ग्राहकांना अनुदान मिळणार नाही.

सध्या केंद्र सरकार संबंधित गॅस एजन्सीच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना याबाबत सूचना करत आहे. या सूचनेनुसार ज्या व्यक्तीच्या नावाने गॅस जोडणी आहे अशा ग्राहकांना केवायसी करण्याकरिता गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये जावे लागेल. त्यावेळी त्या ग्राहकाकडे मोबाईल व आधार कार्ड असणे आवश्यक आहे. या ऑफिसमध्ये ग्राहकाचा बायोमेट्रिक अंगठा घेऊन एक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास गॅस सिलेंडर वितरण व अनुदान सरकारकडून बंद केले जाईल.

परंतु जर एखाद्या ग्राहकाने केवायसी केली नाही तर त्याचे अनुदान बंद होईल. यानंतर तो पुन्हा संबंधित एजन्सी मध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकतो. या एजन्सीकडून संबंधित ग्राहकाची गॅस जोडणी पुन्हा सुरू करण्यात येईल. ग्राहकांनी एक केवायसी केल्यानंतर मोबाईल नंबर बदलला असेल तर तोही अपडेट करता येईल. इतकेच नव्हे तर जोडणी असलेल्या ग्राहकाचा मृत्यू झाला तर ही जोडणी दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने करता येऊ शकते. त्या व्यक्तीला जर सरकारच्या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला वेगळे रजिस्ट्रेशन करावे लागेल. तसेच मोबाईलवरून सिलेंडर रिफिलिंग बुकिंग करावे लागेल. हे बुकिंग केल्याशिवाय ग्राहकाने सिलेंडर घेऊ नये, अन्यथा अनुदानामध्ये नुकसान होऊ शकते.