३० जून पर्यंत Tax, FD, PAN, PPF सह ‘ही’ १३ कामे करा पूर्ण; अन्यथा लागेल मोठा दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या महामारीमुळे देशातील अनेक आर्थिक कार्यक्रम ठप्प झाले आहेत. सुमारे 70 दिवस चाललेल्या या लॉकडाऊनमुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. हे लक्षात घेता सरकारने अनेक गोष्टींची मुदतही 31 मार्च ते 30 जून पर्यंत वाढविली आहे. ज्यामुळे सामान्य लोकांना घराबाहेर पडावे लागणार नाही. 30 जून रोजी आपण कोणत्या आर्थिक गोष्टींची अंतिम मुदत ही 30 जून पर्यंत आहे याची माहित आम्ही आपल्याला देतो, ज्यामुळे आपल्याला या मुदतीपर्यंत आपले काम पूर्ण करावे लागेल…

1. Form 15G/15H भरा
फॉर्म 15G आणि फॉर्म 15H बँकेत सबमिट करून, हे सुनिश्चित केले जाऊ शकते की आपल्या बँक खात्यात जमा झालेल्या उत्पन्नावरच्या व्याजावर टॅक्स लागू होणार की नाही. म्हणजेच त्यावर टीडीएस कापला जाऊ नये. सरकारने सबमिट केलेल्या फॉर्म 15G आणि फॉर्म 15H ची वैधता 30 जून 2020 पर्यंत वाढवली आहे. सीबीडीटीने असा निर्णय घेतला आहे की आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये सादर केलेला फॉर्म 15G आणि फॉर्म 15H हा 30 जून 2020 पर्यंत वैध असेल आणि बँका तसेच वित्तीय संस्था जून अखेरपर्यंत गुंतवणूकदारांच्या व्याज उत्पन्नावरील टॅक्स कमी करणार नाहीत.

2. पोस्ट ऑफिस लाइफ इन्शुरन्स प्रीमियम पोस्टल लाइफ इन्शुरन्स आणि ग्रामीण टपाल जीवन विमा प्रीमियमच्या पेमेन्टचा कालावधी हा देखील 30 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. सर्व पीएलआय आणि आरपीएलआय पॉलिसीधारकांना दिलासा देण्यासाठी, टपाल जीवन विमा संचालनालय, टपाल विभाग, दळणवळण मंत्रालयाने मार्च 2020, एप्रिल 2020 आणि मे 2020 च्या थकबाकीच्या प्रीमियमच्या देयकाची मुदत 30 जून 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावर कोणतेही दंड किंवा डीफॉल्ट फी नसेल.

3. आर्थिक वर्ष 2018-19 साठी आयटीआर
आता करदात्यांना जून अखेरपर्यंत 2018-19 या आर्थिक वर्षासाठी उशीरा आयटीआर दाखल करण्याची संधी मिळाली आहे. या व्यतिरिक्त जर आपण आधीपासूनच आयटीआर दाखल केले असेल तर आपल्याला त्यामध्ये दुरुस्ती करण्याची संधी देखील यावेळी असेल म्हणजेच सुधारित आयटीआर भरण्याची संधी मिळेल.

4. बचत खात्यावर किमान शिल्लक सवलत
आपल्या बचत खात्यात किमान मासिक शिल्लक 30 जूनपर्यंत ठेवण्याची गरजही सरकारने दूर केलेली आहे. जर किमान शिल्लक ग्राहकाच्या बचत खात्यात नसेल तर बँका त्यासाठी कोणतेही दंडात्मक शुल्क आकारणार नाहीत. सध्या मेट्रो शहर, शहरी, अर्ध-शहरी आणि ग्रामीण भागांनुसार बचत खात्यात कमीतकमी शिल्लक ठेवण्याची मर्यादा वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळी आहे.

5. अटल पेन्शन योजनेसाठी ऑटो डेबिट सुविधा
पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) अटल पेन्शन योजनेसाठी ऑटो डेबिट सुविधा (एपीवाय) 30 जून 2020 पर्यंत थांबविली आहे. म्हणजेच, जे लोक एपीवाय मध्ये गुंतवणूक करीत आहेत, त्यांचे बचत खाते आपोआप या योजनेतील योगदानाच्या रक्कमेची कपात करणार नाहीत. मासिक किंवा त्रैमासिक आधारावर या योजनेचे योगदान आहे.

6. आर्थिक वर्ष 2019-20 साठी अ‍ॅडव्हान्स टॅक्स
केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 साठी अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरण्याची तारीखही 30 जून 2020 पर्यंत वाढविली आहे. म्हणूनच, टॅक्स लायबिलिटीवर कोणताही व्याज येऊ नये म्हणून अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरणाऱ्या करदात्यांना 30 जूनपूर्वी आपला टॅक्स सबमिट करण्यास सूचविले आहे. आयकर कायद्यानुसार जर करदात्याची टॅक्स लायबिलिटी ही 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल (ज्येष्ठ नागरिकांकडे ज्यांचे व्यवसायिक उत्पन्न नाही) वगळता, तर या करदात्यांना अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरावा लागेल.

7. PPF खाते विस्तारित
या व्यतिरिक्त, असे निश्चित करण्यात आले की ज्या लोकांचे पीपीएफ खाते 31 मार्च रोजी मॅच्युअर होते आहे, त्यांना एका वर्षाच्या मुदतीसह, जर त्यांना पीपीएफ खाते पुढे सुरु ठेवायचे असेल मात्र या लॉकडाऊनमुळे मार्च 2020 पर्यंत ते सक्षम करू शकले नाहीत, तर त्यांनाही 30 जून 2020 पर्यंत खाते सुरु ठेवण्यासाठी फॉर्म सबमिट करण्याची संधी असेल.

8. PPF, SSY मिनिमम अमाऊंट
सरकारने पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) आणि सुकन्या समृद्धि (एसएसवाय) खातेदारांना दिलासा देताना या दोन्ही खात्यांच्या तरतुदी शिथिल केल्या आहेत. पीपीएफ आणि सुकन्या समृध्दी या खात्यांत लॉकडाऊनमुळे वित्तीय वर्ष 2019-20 साठी मिनिमम डिपॉझिट जमा करण्यास जे सक्षम झालेले नाहीत , ते आता 30 जून 2020 पर्यंत जमा करू शकतात. हा हप्ता उशीरा हप्ता मानला जाणार नाही आणि त्यासाठी कोणतीही पेनल्टी किंवा रिवाइवल शुल्क आकारले जाणार नाही. पीपीएफ आणि सुकन्या समृध्दी खात्यास वित्तीय वर्षामध्ये एक मिनिमम अमाऊंट जमा करणे बंधनकारक आहे. आर्थिक वर्षात पीपीएफ खात्यात ही किमान ठेव 500 आणि सुकन्या समृद्धि योजनेसाठी 250 रुपये आहे.

9. आधार-पॅन जोडणे
पॅनकार्डला आपल्या आधारशी जोडण्याची शेवटची तारीख सरकारने यापूर्वीच 30 जूनपर्यंत वाढवली होती. पूर्वी ती 31 मार्च होती. आता, 30 जूनच्या अंतिम मुदतीत जर आपले पॅन कार्ड आपल्या आधारशी जोडले गेले नाही, तर ते यापुढे वैध राहणार नाही. जिथे जिथे पॅनकार्डची आवश्यकता असेल तसे कोणतेही आर्थिक व्यवहार आपण करू शकणार नाही.

10. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या खात्यात 30 जून 2020 पर्यंत गुंतवणूक करण्यासाठी सरकारने फेब्रुवारी ते एप्रिल 2020 दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांची अंतिम तारीख 30 जून 2020 पर्यंत वाढविली आहे. योजनेच्या नियमांनुसार 55 ते 60 वर्षे वयाचे सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीचा लाभ मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत एससीएसएस योजनेत गुंतवणूक करता येईल.

11. गुंतवणूकीवरील करात सूट
30 जून पर्यंत आपण अशा स्कीममध्ये किंवा प्लॅनमध्ये गुंतवणूक केली असेल ज्यात इनकम टॅक्स ऍक्ट नुसार सवलत मिळत असेल तर आपण त्या आर्थिक वर्ष 2019-20 साठीचा आपला टॅक्स रिटर्न क्लेम करु शकता. एलआयसी, पीपीएफ, एनपीएस यासारख्या योजनांमध्ये 30 जूनपर्यंत गुंतवणूक करून करात सूट मिळू शकते असे अधिसूचनेद्वारे सरकारने स्पष्ट केले आहे. 30 जून पर्यंत घेतल्यास नवीन एलआयसी, मेडिक्लेम, पीपीएफ, एनपीएस सारख्या योजना आर्थिक वर्ष 2019-20 साठी डिडक्शन करण्यास पात्र असतील. एलआयसीच्या जुन्या पॉलिसीवरील प्रीमियम, मेडिक्लेम, पीपीएफ, एनपीएस यासारख्या योजनांवर 30 जूनपर्यंत पेमेंट जमा करण्याची मुदत देण्यात आलेली आहे.

12. कोणत्याही बँकेच्या एटीएममधून कितीही वेळा पैसे काढले जाणे
30 जूनपर्यंत कोणत्याही बँकेच्या एटीएममधून कोणत्याही बँकेच्या डेबिट / एटीएम कार्डमधून रोकड काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आत्ता इतर बँकांच्या एटीएममधून काही प्रमाणात फ्रीमध्ये रोख रक्कम काढता येणार आहे. मात्र ती संख्या संपल्यानंतर केलेल्या ट्रान्सझॅक्शनवर चार्ज द्यावा लागेल.

13. फॉर्म -16
सरकारने कंपन्यांना फॉर्म 16 देण्याची मुदत 15 जून ते 30 जून पर्यंत वाढविली आहे. फॉर्म 16 हे एक टीडीएस सर्टिफिकेट आहे. कंपनी पगारामधून स्त्रोत कर कापते त्यामध्ये त्याचा पूर्ण तपशील असतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment