चेन्नई । लॉकडाऊनचे ४ टप्पे पूर्ण केल्यांनतर देशात अनलॉक-१ अंतर्गत परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र, देश अनलॉक होत असताना देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील इतर राज्यांप्रमाणे तामिळनाडूतही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळं राज्य सरकारने तामिळनाडूतील चार जिल्ह्यांमध्ये १९ जून ते ३० जून पर्यंत पूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.
तामिळनाडू राज्यातील चेन्नई, चेनगालपट्टू, थिरुवल्लूर आणि कांचीपूरम हे ४ जिल्हे १९ जूनपासून पुन्हा पूर्णपणे लॉकडाउन होणार आहेत. अत्यावश्यक सेवा, रुगणालय, टेस्टिंग लॅब आणि वैद्यकीय सेवांना निर्बंधांमधून वगळण्यात येईल. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. या लॉकडाऊन दरम्यान विमान आणि ट्रेन सेवा प्रोटोकॉलनुसार मात्र सुरु राहणार आहे. इमर्जन्सी सोडल्यास टॅक्सी आणि रिक्षांना रस्त्यावर अजिबात परवानगी नसेल.
जनतेने खासगी गाडयांचा वापर न करण्यास तसेच घरापासून २ किलोमीटरच्या परिसरातूनच जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्याचे प्रशासकीय यंत्रणांनी आवाहन केले आहे. ३३ टक्के उपस्थितीसह सरकारी कार्यालये सुरु राहतील. पण कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना कामावर येऊ नका असे सांगण्यात येईल. रविवारी तामिळनाडूत १ हजार ९७४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत राज्यात ४४ हजार ६६१ जण कोरोनाबाधित झाले असून ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in