कराड- चिपळूण मार्गावरील रस्त्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : आ. शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गच्या प्रलंबित कामाबाबत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला. कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित रस्त्याची कामे एल अँड टी कंपनीने तातडीने पूर्ण करा अशा सूचना संबंधितांना मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, नाडे, मल्हारपेठ, आडूळ, म्हावशी या गावातील अपूर्ण राहिलेली कामे तात्काळ पूर्ण करावी. हेळवाक ते ढाणकल रस्त्याचे डांबरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे. पाटण ते संगमनगर नव्याने होणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे.

या बैठकीस जिल्हाधिकारी सातारा रूचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, मुख्य अभियंता संतोष शेलार, अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.