Breking | पुण्यात भिंत कोसळून १६ ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | दिवसभर पडलेल्या पावसाने पुण्यात कोंढवा परिसरात आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून १६ जण ठार झाल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे. हि घटना बडा तलाव मस्जिद परिसरात घडली आहे. अग्निशामक दलाच्या वतीने आणि एनडीआरएफ (NDRF)च्या वतीने बचाव कार्य वेगात केले जात आहे.

या ठिकाणी १८ जण राहत होते. त्या पैकी एक व्यक्ती बचावला आहे तर एक महिला जखमी आहे. त्या महिलेस तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. तर मृत व्यक्तींमध्ये चार महिलांचा आणि दोन लहान मुलांचा समावेश असल्याचे या अपघातून बचावलेल्या व्यक्तीने सांगितले आहे.

जिल्हाधिकारी म्हणतात….
पुण्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे हा प्रकार घडला आहे अशा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. तसेच या घटनेसाठी या भिंतीचे बांधकाम करणारी कंपनी देखील दोषी आहे. या अपघात मरण पावलेले लोक हे बिहार आणि पश्चिम बंगला येथील कामगार आहेत. ते स्वतःची गुजराण करण्यासाठी पुण्यात आले होते. त्यांना सरकार कडून मदत देण्यात येईल असे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी म्हणले आहे.

आत्तापर्यंत मृतांची समोर आलेली नावे
आलोक शर्मा (२८), मोहन शर्मा (२०), अजय शर्मा (१८), अभंग शर्मा (१९), रवि शर्मा (१९), लक्ष्मीकांत सहानी (३३), अवधेत सिंह (३२), सुनील सींग (३५), ओवी दास (६ ), सोनाली दास (२ ), विमा दास (२८), संगीता देवी (२६) तर पूजा देवी (२८) वर्षे हि गंभीर जखमी आहे.

Leave a Comment