औरंगाबाद: उपचारादारम्यान एका 65 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांशी हुज्जत घालत गोंधळ केला मात्र पोलीस येताच भावनेच्या भरात चूक झाल्याचे मान्य करीत प्रकरण मिटले ही घटना वाळूज औधोगिक वसाहतीतील वाळूज रुग्णालयात घडला.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की,दोन दिवसांपूर्वी एका 65 वर्षीय वृद्धेला त्रास जाणवत असल्याने वाळूज हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्या वृद्धेचा मृत्यू झाला. ही बाब कळताच चार ते पाच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेत कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असताना तुम्ही कोविड वॉर्डात का ठेवले होते .असा प्रश्न उपस्थित करीत नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
सूत्रांनुसार नातेवाईकांनी एक डॉक्टर आणि कंपाउंडेर ला देखील मारहाण केल्याचे कळते. हा गोंधळ पोलिसांना कळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली.पोलिसांना पाहून नातेवाईक नरमलेव भावनेच्या भरात कृत्य केल्याचे मान्य करीत डॉक्टरकडे माफीनामा लिहून दिला.त्या नंतर रुग्णालय प्रशासनाने देखील पोलीसात तक्रार दिली नाही. या प्रकरणी दोघांची तक्रार नाही असे एम.आय.डी.सी. वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा