कराड | कराड तालुक्यातील तांबवे येथील नंदकिशोर आण्णासाहेब पाटील यांची केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन अंतर्गत दिल्ली पोलिसमध्ये पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून पहिल्याच प्रयत्नात निवड झाली आहे. शेतकरी कुटुंबातील नंदकिशोरने कोणत्याही क्लासविना यश मिळवून देशाच्या राजधानीत गावचा झेंडा रोवला आहे. अवघ्या वयाच्या 26 व्या वर्षी नंदकिशोरने यश मिळविले आहे. त्याच्या या यशाने तांबवे गावाचाही नावलौकीक वाढला आहे.
देशातून परीक्षेसाठी आठ लाख विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये एक हजार ६०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये देशात ७१ वा क्रमांक पटकावून नंदकिशोर यशस्वी झाला आहे. त्यामुळे तांबवे गावच्या लौकीकात भर पडली आहे.
त्याच्या यशाबद्दल बोलताना नंदकिशोर म्हणाला, केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे. त्याअंतर्गत सेंट्रल पोलिस ऑर्गनायझेशनतर्फे पोलिस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात येते. त्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. यावेळच्या परीक्षेत देशातून आठ लाख मुलांमध्ये माझा ७१ वा क्रमांक आला आहे. माझ्यासाठी हे मोठे यश आहे. हे यश मी कोणताही क्लास न लावता तांबवे सारख्या खेड्यातील घरी स्वतः अभ्यास करुन मिळवले आहे. तरुणांनी कोणतेही काम, अभ्यास मन लावून केला की यश मिळतेच. त्यासाठी ध्येय ठरवून अभ्यास करावा.
शेतकऱ्यांच पोर
नंदकिशोर शेतकरी कुटंबातील आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य आण्णासाहेब पाटील यांचा मुलगा आहे. त्याचबरोबर त्यांचे चुलते विकास पाटील शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत तर चुलत भाऊ उत्कर्ष पाटील हाही चांगला शेतकरी आहे. नंदकिशोरच्या यशाने शेतकरी कुटुंबाचाच सन्मान झाला आहे.
सेल्फ स्टडी आणि इंटरनेटचा योग्य वापराने यश ः नंदकिशोर
माझे शिक्षक कराडच्या होली फॅमिली येथे झाले, त्यानंतर 11 वी व बारावी वायसी काॅलेज आणि पुढे गव्हरमेंट काॅलेज इंजिनियअरींग येथे इलेक्ट्रीक इंजिनियर झालो. काॅलेज कॅम्पसमधून एका कंपनीत सिलेक्शन तेथे दीड वर्ष काम केले. परंतु वेगळा मार्ग निवडायचा या हेतून तो जाॅब सोडला आणि सेल्फ स्टडी केला. इंटरनेटचा वापर चांगल्या गोष्टीसाठी केला. इंटरनेटवर सर्व माहिती मिळत होती. त्यामुळे कोणताही क्लास न लावता केवळ इंटरनेटच्या सहाय्याने व इच्छाइशक्तीच्या जोरावर यश मिळाल्याचे नंदकिशोर याने सांगितले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा