कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये कराड सोसायटी मतदारसंघातून महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील विजयी झाल्याबद्दल आज त्यांच्या निवासस्थानी नगराध्यक्षा रोहिनी शिंदे यांनी भेट घेतली.
यावेळी नगराध्यक्षांनी विविध विषयावर ना. पाटील यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी उमेश शिंदे, महेश महादर, श्र्षिकेश कुंभार, संदीप घेवरे, रविराज भोसले, विनायक घेवदे, तुषार जोगदंडे हे उपस्थित होते. दरम्यान ना. बाळासाहेब पाटील यांची सातारा जिल्हा बँक संचालक पदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कराड नगरपरिषदचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, नगरसेवक हनुमंतराव पवार , विजय वाटेगावकर , बाळासाहेब यादव, गजेंद्र कांबळे, नगरसेविका स्मिता हुलवान, निशांत ढेकळे, ओमकार मुळे, राहुल खराडे, प्रीतम यादव, बापू देसाई, दिनेश यादव आदी उपस्थित होते. यावेळी ना. पाटील यांच्याशी कराड विमानतळ प्राधिकरणाने जाचक अटी लावल्या आहेत त्याच्या बद्दल सविस्तर चर्चा ही केली.