प्रियांका गांधी यांच्या गाडीला भाजप नेत्याच्या गाडीची धडक; अपघातात चार गाड्यांचे नुकसान

नवी दिल्ली | काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. भाजप नेत्याच्या गाडीची धडक लागून हा अपघात झाल्याचे समजत आहे.

आज सकाळी साडे सहा वाजता प्रियांका गांधी अमरोहाहून रामपूर जाताना हा अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहाणी झालेली नाही. यामध्ये चार गांड्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, 26 जानेवारी रोजी प्रियांका गांधी सकाळी रामपूरला दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीच्या वेळी झालेल्या अपघातात ठार झालेल्या नवरिता सिंगच्या शेवटच्या अरदासमध्ये सामील होण्यासाठी निघाल्या. त्यानंतर त्यांच्या ताफ्यातील दोन वाहने गढगंगा टोल प्लाझाजवळ धडकल्या. अपघात किरकोळ असून यात कोणतीही जखमी व जीवितहानी झाली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like