Saturday, March 25, 2023

हा व्यक्ती मुलींसाठी फार धोकायदायक ; कंगनाला सल्ला देताना काँग्रेसने साधला राम कदमांवर निशाणा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून सातत्यानं काही विधाने करून बॉलीवूड कलाकारांवर तसेच राजकीय नेत्यावर टीका करत आहे.आता तर तिने आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असं म्हणत मुंबई पोलिसांची सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. भाजपाचे आमदार राम कदम यांनी केलेल्या ट्विटवर तिनं हे उत्तर दिल होत. यावरून काँग्रेसनं कंगनाला सल्ला देताना राम कदमांवर अचूक निशाणा साधला आहे.

भाजपाचे नेते राम कदम यांनी कंगनाला सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर कदम यांच्या ट्विट ला उत्तर देताना कंगना म्हणाली होती, “मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय”, इतकंच नाही तर “हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको” असंही कंगना म्हणाली होती.

- Advertisement -

कंगनानं मुंबई पोलिसांबद्दल हे विधान केल्यानंतर काँग्रेसनं तिला सल्ला दिला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून तुम्ही राम कदम यांच्यापासून घाबरून राहायला हवं, असं म्हटलं आहे. “कंगनाजी खरंतर तुम्ही ज्या व्यक्तीचे आभार मानले आहेत, त्याच्यापासूनच घाबरून राहायला हवं. मुलींसाठी हा व्यक्ती फार धोकादायक आहे,” असं म्हणत सावंत यांनी कदम यांच्यावरही निशाणा साधला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’