पेट्रोल डिझेल दरवाढीवर काँग्रेस आक्रमक; जालना जिल्ह्यात आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना: केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल – डिझेल आणि गॅसच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ केल्यामुळे सामान्य जनतेचे जगणे कठिण बनले आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेचा निषेध व्यक्त करून जालना शहर तसेच संपूर्ण मराठवाड्यात काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. सोमवार रोजी सकाळी आकरा वाजता जालना शहरातील अनेक पेट्रोल पंपवर केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढी विरोधात निषेध म्हणून जाफराबाद तालुका काँगेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली अंदोलन करण्यात आले. जालना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये या दरवाढी विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.

पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे. मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढीविरोधात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या सूचनेनुसार हे संपूर्ण बीड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले.

परभणी जिल्ह्यात पेट्रोलचे दर मराठवाड्यात सर्वाधिक आहे. येथील सामान्य नागरिकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. या इंधन दरवाढी विरोधात शहर काँग्रेसच्या वतीने सोमवारी शहरातील भीकुलाल पेट्रोलपंप येथे आंदोलन करण्यात आले. अच्छे दिन येतील असे स्वप्न सर्वसामान्यानांना दाखवून गोर-गरीब जनतेला महागाईच्या खाईत ढकलण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे.सुरुवातीला मोफत स्वयंपाकाचा गॅस देण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने आज गॅस सिलेंडर वरची सबसिडी बंद केली आहे. गॅसचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट देखील कोलमडले आहे. अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सर्वसामान्य जनतेच्या खिशावर हात घालून भांडवलदारांना पायघड्या घालण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचा आरोप यावेळी सर्व सामान्य जनता तसेच कॉंग्रेसच्या वतीने केला जात आहे.

Leave a Comment