व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्राचा अपमान जनता आता सहन करणार नाही; नाना पटोलेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महाराष्ट्र तसेच काँग्रेसवर टीका केली. या विरोधात आज महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन करण्यात आले. “महाराष्ट्र हे देशात करोना वाढवणारे राज्य आहे. ज्या राज्याने इथल्या जनतेने मदत करण्याचं काम केले, त्या जनतेचा अवमान करण्याचा अधिकार मोदींना नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान जनता आता सहन करणार नाही, असा इशारा पटोले यांनी पंतप्रधानांना दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणा दरम्यान केलेल्या विधाना विरोधात महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान जनता आता सहन करणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात भाजपा कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे”.

यावेळी मुंबईत करण्यात आलेल्या आंदोलनावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीही केली. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. “मोदी ते तानाशाही नही चलेगी, मोदी तेरी हिटलरशाही नही चलेगी, राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, झुठा है झुठा है नरेंद्र मोदी झुठा है, अशी घोषणाबाजी यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.