सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊ; काँग्रेसची मोठी घोषणा

Congress party
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) विजय मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जनतेला मोठमोठी आश्वासने देण्यात येत आहेत. यातीलच एक भाग म्हणून आता काँग्रेसने जनतेला आश्वासन दिले आहे की, “इंडिया आघाडीचे (India Alliance) सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भारतीय भाषेचा दर्जा देऊ”. ज्यामुळे आता काँग्रेस या लोकसभा निवडणुकीत मराठी भाषेचा मुद्दा हाताशी धरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

नुकतेच काँग्रेस नेते जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी X वर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी “इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जाईल, हे वचन आहे” असे म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात नवा वाट पाहायला मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये काय म्हणले??

जयराम रमेश X वर ट्विट करत म्हणले आहे की,” डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भारतीय भाषा म्हणून दर्जा देण्यात आला होता. 11 जुलै 2014 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठीला अभिजात भारतीय भाषा म्हणून घोषित करण्यासाठी अहवाल सादर केला होता. सदर अहवालावर आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांपासून काहीही निर्णय घेतला नाही. इंडीया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भारतीय भाषेचा  दर्जा दिला जाईल, हे वचन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देत आहे”

त्याचबरोबर, “मराठीच्या समृद्ध अभिजात इतिहासाचा पुरावा देणारा सबळ अहवाल यूपीएच्या अखेरीस सादर शासनाकडे करण्यात आला असे असुनही मागील 10 वर्षातील काळात नरेंद्र मोदींनी एकही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही किंवा नोंद केलेली नाही. मार्च 2022 मध्ये काँग्रेस खासदार श्रीमती रजनी पाटील यांनी याबद्दल राज्यसभेत आवाज उठवला होता तरी पण या बाबतीत पूर्ण 2 वर्षे उलटूनही पंतप्रधान मौन आणि निष्क्रिय आहेत. आम्हाला विश्वास आहे की, महाराष्ट्रातील मतदार या पंतप्रधानांना त्यांच्या मराठीबद्दलच्या असलेल्या त्यांच्या उदासिनते बद्दल चांगलाच धडा शिकवतील” असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे.