हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसच्या महापालिकांना निधी दिला जात नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. आता मात्र त्यांनी त्या वादग्रस्त विधानाबाबत यु टर्न घेतला आहे. मी तसं म्हणालोच नाही, तिथेही निधी मिळायला पाहिजे, अशी अपेक्षा असल्याचे मी सांगितले अस अशोक चव्हाण यांनी म्हंटल.
काँग्रेसच्या महापालिकांना निधी दिला जात नाही, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. मी तसं म्हणालो नसल्याचं सांगत अशोक चव्हाणांनी एकप्रकारे हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याबाबत ते आज नांदेडमध्ये बोलत होते. या प्रकरणावर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे
यापूर्वी काय म्हणाले होते अशोक चव्हाण
“काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला,” असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत दाखल झाले. यावेळी त्यांनी परभणीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे विधान केले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’