नोटाबंदी, GST आणि लॉकडाऊन हे मोदींचे ‘मास्टरस्ट्रोक’ नाहीतर ‘डिझास्टर स्ट्रोक’ ठरलेत- काँग्रेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ढासळती अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून मोदी सरकारवर टीका केलीय. गेल्या ७३ वर्षांत पहिल्यांदाच अर्थव्यवस्था आणि व्यक्ती या दोघांचंही कंबरडं मोडण्यात आलंय. आर्थिक उद्ध्वस्तता आणि आर्थिक आणीबाणीकडे देशाला ढकललं जात आहे. कोसळणारा जीडीपी याचा ढळढळीत पुरावा आहे. नोटाबंदी जीएसटी आणि लॉकडाऊन ‘मास्टरस्ट्रोक’ नाही तर ‘डिझास्टर स्ट्रोक’ ठरलेत असं सुरजेवाला यांनी म्हटलंय. याशिवाय देशात प्रत्येक दिवसाला ३८ बेरोजगार आणि ११६ शेतकरी आत्महत्या करत असताना पंतप्रधानांना झोप तरी कशी लागू शकते? असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना धारेवर धरलंय.

मागील ६ वर्षांपासून ‘अॅक्ट ऑफ फ्रॉड’च्या माध्यमातून अर्थव्यवस्था हाकणारे आता ‘अॅक्ट ऑफ गॉड’च्या नावावर खपवत आहेत. जीडीपीची घसरण सामान्यांच्या जीवावर उठलीय. लोकांचा आणि बँकांचा सरकारवरून तसंच सरकारचा आरबीआयवरून विश्वास नष्ट झालाय, असंही सुरजेवाला यांनी म्हटलंय. ढासळत्या अर्थव्यवस्थे दरम्यान केंद्रानं जीएसटीमध्ये राज्यांचा वाटा देण्यास नकार दिला आहे. जर राज्यांचा पैसा केंद्रानं गुडूप केला तर देश कसा चालणार? असा प्रश्नही सुरजेवाला यांनी विचारलाय.

देशातील ८० लाख लोकांनी आपल्या पीएफ खात्यातून ३० हजार कोटी रुपये काढलते. ६ कोटी ३० लाख लघु-मध्यम उद्योगधंद्यांपैकी अनेक बंदीच्या उंबरठ्यावर आहेत. पंतप्रधान मात्र को कोरोना, चीन, अर्थव्यवस्था, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रश्नांपासून बचावाच्या प्रयत्नात आहेत. पण आम्ही संसदेत आणि संसदेच्या बाहेरही आपलं म्हणणं मांडतच राहू, असंही सुरजेवाला यांनी म्हटलंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment