Wednesday, February 8, 2023

अन्यथा राहुल गांधी म्हणतात तसे ‘चौकीदार ही चोर है’ हेच सत्य- बाळासाहेब थोरात

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | फ्रान्समध्ये राफेल व्यवहाराची चौकशी सुरू झाली असताना भारतातच राफेल व्यवहाराची चौकशी का केली जात नाही, असा प्रश्न काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. राफेल व्यवहार जर स्वच्छ व पारदर्शी झाला असेल तर मोदी सरकारने त्याची चौकशी करून जनतेसमोर सत्य आणलं पाहिजे. अन्यथा राहुल गांधी म्हणतात तसं चौकीदार ही चोर है हेच सत्य आहे, असं थोरात म्हणाले.

यूपीए सरकारच्या काळातच १२६ राफेल लढाऊ विमाने प्रत्येकी ५५६ कोटी रुपयांना खरेदी करण्याचे निश्चित झाले होते, परंतु त्यानंतर आलेल्या मोदी सरकारने याच विमानांसाठी १,६७० कोटी रुपये देऊन व्यवहार केला. हा व्यवहार करताना अनेक बाबींना फाटा देण्यात आला. तसेच मोदींच्या उद्योगपती मित्रांचा फायदा व्हावा यासाठी या क्षेत्रातील काहीही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले असा आरोप त्यांनी केला.

- Advertisement -

राफेल व्यवहारात गडबड झाल्यानेच फ्रान्समध्ये याची चौकशी सुरु झाली आहे. मग भारतातच या व्यवहारावर पांघरुण घालण्याचे काम का केले जात आहे? राफेल व्यवहार पारदर्शकपणे झाला असेल तर त्याची चौकशी करून जनतेसमोर सत्य आणले पाहिजे अन्यथा राहुल गांधी म्हणतात तसे ‘चौकीदार ही चोर है’ हेच सत्य आहे असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.