मोदींजींच्या खोट्या १५ लाखांपेक्षा संकटकाळात प्रत्यक्ष मिळणारे १५०० रुपये लाखमोलांचे ; काँग्रेसचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ठाकरे सरकारने कडक निर्बंध लादत राज्यात संचारबंदी केली आहे. परंतु ही घोषणा करतानाच त्यांनी हातावरील पोट असणाऱ्यांना 5476 कोटींचे आर्थिक पॅकेज देखील जाहीर केले. तसेच मोफत शिवभोजनची घोषणा केली आहे.

याअंतर्गत परवाना असलेल्या रिक्षाचालकाना आणि फेरीवाल्यांना 1500 रुपयेची मदत राज्य सरकार कडून करण्यात येईल. तसेच राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 1500 रुपये देणार असून त्याचा 12 लाख कामगारांना उपयोग होणार आहे. तसेच आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी 2000 रुपये देण्यात येईल. दरम्यान विरोधकांनी या पॅकेज वरून टीका केली असली तरी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी मात्र या घोषणेचं स्वागत केले आहे.

मोदींजींच्या खोट्या १५ लाखांपेक्षा संकटकाळात प्रत्यक्ष मिळणारे १५०० रुपये लाखमोलांचे अस म्हणत भाई जगताप यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे. तसेच मी महाविकासआघाडीसोबत असही भाई जगताप यांनी म्हंटल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group