भारती विद्यापीठ येथे काॅंग्रेसच्यावतीने आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता व रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचे सुचनेप्रमाणे व कराड दक्षिण काँग्रेस
कमिटी यांचेवतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 व्या जयंतीचे औचित्य साधून 130 जणांनी रक्तदान शिबीरात केले. शिबीराचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

या कार्यक्रमास काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी उदयसिंह पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदेश युवक उपाध्यक्ष शिवराज मोरे, जि.प.सदस्य निवासराव थोरात, इंद्रजित चव्हाण, इंद्रजित गुजर, मलकापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षा सौ. निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेवक शहाजी पाटील, आनंदराव सुतार, जयंत कुराडे, किशोर येडगे, नगरसेविका गितांजली पाटील, आनंदी शिंदे, पुजा चव्हाण, स्वाती तुपे, नंदा भोसले तसेच नरेंद्र पाटील, प्रा. धनाजी काटकर, रंगराव थोरात,
वैभव थोरात, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर तसेच यशवंतराव चव्हाण कराड बँकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

शिबीरास प्रसंगी आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराड दक्षिण काँग्रेस कमिटी यांचेवतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 130 व्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित केले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. मलकापूर नगरपरिषदेने अनेक नाविण्यपुर्ण उपक्रम राबवून देशामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने दि.14/04/2021 रोजी रात्री 8.00 वाजलेपासून संचारबंदी लागु केलेली असून, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापनांना निर्बंध घातले आहेत. त्यास सर्व नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावी. तसेच माझे कुटूंब माझी जबाबदारी याप्रमाणे सर्वांनी मास्कचा वापर केला पाहिजे. नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये व सामाजिक अंतर (सोशल डिस्टसिंगचे) काटेकोरपणे पालन करावे. यावेळी रक्तदान करणाऱ्या
रक्तदात्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करणेत आले.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like