देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले ; काँग्रेसची जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब मुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ शेअर करत पवारांना प्रत्युत्तर दिले. 15 फेब्रुवारीला अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद झाली मग ते क्वारंनटाईन कसे असा सवाल फडणवीस यांनी केला होता. यावरून आता काँग्रेसने फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

“15 फेब्रुवारीला प्रेस झाली परंतु हॉस्पिटलच्या परिसरात देशमुखांना डिस्चार्ज मिळाल्यावर! खोटे बोलून संभ्रम तयार करायचा! सत्ता गेल्यानंतर काही माणसांचे मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस. भाजप नेते कृपा करून तपासून घ्या” असे टीकास्त्र काँग्रेस नेते राजू वाघमारेंनी केलं आहे.

परमवीर सिंग यांचा लेटर बॉम्ब फुसका! फेब्रुवारीत सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची शंका! आणि भेट जरी झाली तरी 100 कोटींच्या वसुलीची बातमी खरी कशी? फक्त अधिकारी पत्र देतो म्हणून मंत्री राजीनामा देणार? गुन्हा हा जिलेटीन कार आणि मनसुख हिरेन मृत्यू तपास भरकटवून सिंग!आता भाजप स्वतःचे तोंड काळे करतील का?” असा टोलाही राजू वाघमारेंनी लगावला आहे.

फडणवीस नक्की काय म्हणाले –

देवेंद्र फडणवीस यांनी थेट 15 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओच ट्विट केला. “देशमुख यांनीच हा व्हिडीओ ट्विट केला होता. 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यमप्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?”, असा सवाल फडणवीस यांनी केला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment