”पेट्रोल पंपावरील फोटोमध्ये आधी मोदी हसायचे, मग मास्क घातला, आता वाटतं त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधावी”

मुंबई । देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. दररोजच्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण पडतोय. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढ होत आहे. घरगुती गॅसच्या किमतीही वाढल्या आहेत. या इंधन दरवाढीवरुन विरोधकांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर हल्ला चढवायला सुरुवात केली आहे. देशातील पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवरुन आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केलीय.

”प्रत्येक पेट्रोल पंपावर पंतप्रधान मोदींचा फोटो आहे. त्या फोटोमध्ये ते आधी हसायचे. मग मास्क घातला. आता वाटतं की त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधावी. कारण त्यांना ही लूट दिसत नाही”, अशा शब्दात सावंत यांनी इंधन दरवाढीवरुन मोदींना टोला लगावला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

तेल कंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. त्यानुसार आज सलग 11 व्या दिवशी ही वाढ झाली आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये तर पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. दिल्लीत 31 पैसे वाढीसह 90.19 वर पोचलं तर मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 96.62 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच मेट्रो शहरांमध्ये इंधनाच्या किंमती वाढल्याचं पाहायला मिळालं आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.