वाराणसीत मोदींच्या पराभवासाठी कॉंग्रेसने आखली हि खेळी ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | नरेद्र  मोदी यांचा वाराणसीत पराभव घडवून आणण्यासाठी कॉंग्रेसने नवीन  रणनीती आखली आहे. अमेठीत ज्या प्रमाणे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना रोखण्याचा भाजप प्रयत्न करत आहे, तशाच तोडीची रणनीती कॉंग्रेस वाराणसीत मोदींच्या विरोधात आखत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार उमेदवारी अर्ज भरण्याच्या  शेवटच्या दिवशी वारानासीतून प्रियांका गांधी यांचे नाव जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

भाजप ज्या प्रमाणे धक्का तंत्राचा अवलंब करते त्याच प्रमाणे प्रियांका गांधी यांच्या रूपाने नरेद्र मोदी यांना धक्का देण्याच्या तयारीत कॉंग्रेस आहे असे सध्या दिसते आहे. नरेद्र मोदी यांचा २०१४ साली ज्या फरकाने वाराणसीत विजय झाला. तो फरक मोदी लाट पाहता अत्यंत अल्प होता. म्हणून या ठिकाणी कॉंग्रेस प्रियंका गांधी यांना निवडणुकीला उतरवू शकते असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.

गत वेळी नरेद्र मोदी यांच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक लढली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. कॉंग्रेसचे उमेदवार असणाऱ्या अजय रॉय यांना त्यावेळी तिसऱ्याक्रमांकाची मते मिळाली होती. सध्या देशात मोदी लाट नाही. त्याच प्रमाणे बसपा सपा आणि कॉंग्रेस  एकत्रित आले तर मोदींना चांगलीच टक्कर देवू शकेल आसे कॉंग्रेसला वाटते म्हणून कॉंग्रेस प्रियांका कधी यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याचा निर्णय करते आहे.

Leave a Comment