फडणवीसांनी कोणत्या खात्यातून साडे चार कोटींचे रेमडेसिवीर खरेदी केली याची चौकशी झाली पाहिजे – काँग्रेस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या संचालकाला रेमडेसिविरच्या साठेबाजीप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर फडणवीसांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पहायला मिळाले. दरम्यान महाराष्ट्रातील जनतेलाच या रेडिमेसिविर देण्यात येणार होत्या असा दावा भाजपने केला आहे. यावरून काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी

ट्विट करत दिग्विजय सिंह यांनी म्हटले की, खर तर, कोणत्या खात्यातून साडे चार कोटींचे रेमडेसिवीर फडणवीसांनी खरेदी केले, याची चौकशी झाली पाहिजे. तसेच त्यांनी कोणाच्या परवानगीने हे केले याची देखील चौकशी झाली पाहिजे. ही अत्यंत लाजिरवणी बाब आहे.

दरम्यान, जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यात लोक रेमडेसिवीरसाठी वणवण करत आहेत आणि लोक जीव वाचवण्यासाठी रेमडेसिवीर मिळावं म्हणून आटापिटा करत आहेत. तेव्हा जबाबदार पदावर राहिलेल्या भाजप नेत्यानं रेमडेसिवीरची साठेबाजी करावी हे कृत्य मानवतेच्या विरोधात गुन्हा आहे, असं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे

You might also like