काँग्रेसमुळेच सत्तेत आहात हे विसरू नका; शिवसेना- राष्ट्रवादी वादात काँग्रेसची उडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीची सत्ता असली तरी तिन्ही पक्षातील अंतर्गत वाद नेहमी उफाळून आला आहे. त्यातच आता शरद पवारांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अस विधान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केल्यानंतर त्यांना शिवसेनेने थेट प्रत्युत्तर देत मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत आहे असा सवाल केला आहे . दरम्यान या वादात काँग्रेसने देखील उडी मारत आपल महत्त्व दाखवून दिले आहे.

काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ते कॉंग्रेसमुळे सत्तेत असल्याची आठवण करून दिली आहे. ‘खा.कोल्हे म्हणतात पवार साहेबांन मुळे मा.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री शिवसेना म्हणते आमच्या सहकार्याने राष्ट्रवादी सत्तेत पण कृपा करून दोन्ही पक्षांना याचा विसर पडू देऊ नका काँग्रेस मुळे आपण सत्तेत आहात तसा विसर पडत नाही म्हणा पण आठवण दिलेली बरी.’ असा खोचक टोला वाघमारे यांनी लगावला आहे

काय आहे प्रकरण-

शरद पवारांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अस विधान राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केल्यानंतर त्यांना शिवसेनेचे प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी थेट प्रत्युत्तर देत हल्लाबोल केला. अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली बहुतेक, तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधी कधी स्मरणशक्ती विसरतात, तसेच अमोल कोल्हे यांचे आज झाले, आपण ज्या उद्धव साहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले अशी टीका त्यांनी केली.

Leave a Comment