जातीयवादी विचारांना काँग्रेसने हद्दपार केले : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

उंडाळे- सवादे भागातील बरेचसे लोक कामानिमित्त मुंबईला असतात. गावाच्या विकासासाठी ते सर्वजण गावकऱ्यांच्या सोबत कायमच असतात. अश्या वेळी प्रत्येक निवडणुकीत या भागातील गावांनी काँग्रेस पक्षाचा विचार जपला आहे. स्व यशवंतराव मोहिते, स्व. विलासराव पाटील व त्यांच्यानंतर माझ्या पाठीशी येथील जनता ठामपणे उभी असल्याने राज्यात व देशात काम करण्याची संधी मिळाली व त्यामुळेच या भागात विकास करता आला. अजून भरपूर विकासकामे या भागात करायची आहेत. धोरणात्मक पद्धतीने या भागातील विकास आजपर्यंत झाला आहे यापुढेही केला जाईल. चातुर्वर्णाची उतरंड काँग्रेस पक्षाने मोडीत काढून घटनेनुसार देशात सर्वांना सोबत घेऊन विकास केला. संधीची समानता व सर्वाना समान वागणूक कायमच काँग्रेस पक्षाने देशात रुजविली आहे. जातीयवादी विचारांना काँग्रेसने जसे हद्दपार केले तसेच या भागातील जनतेने सुद्धा हद्दपार केले आहे. काँग्रेसच्या विचारांची पाईक असलेल्या जनतेने कधीच जातीय शक्तींना थारा दिला नसल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

उंडाळे- सवादे भागात विविध विकासकामांचे भूमिपूजन, उदघाटनं कार्यक्रम माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत जि प सदस्य उदयसिंह पाटील, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, सवादे च्या सरपंच लक्ष्मीताई सुतार, उपसरपंच पुजाराणी थोरात, इंद्रजीत चव्हाण, शिवाजीराव मोहिते, नरेंद्र पाटील, उदय पाटील (आबा), मलकापूरचे नगरसेवक राजेंद्र यादव, येळगावचे माजी सरपंच मन्सूर इनामदार, मालखेडचे देवदास माने, बाजीराव थोरात, प्रकाश पाटील, तुकाराम थोरात, शिवाजीराव थोरात, विलास थोरात, रघुनाथ पाटील, महादेव थोरात, दीपक थोरात, हिम्मत थोरात, दादासो थोरात (LIC), निवास थोरात, शंकर थोरात, मारुती शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा थोरात, जयश्री कदम, जयश्री साठे, कविता बांदेकर, शिवाजी सुतार आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

यावेळी सवादे ते तुळसण ग्रामीण मार्ग रस्ता डांबरीकरण साठी १५ लाख रु., व्यायाम शाळा बांधणीसाठी १५ लाख रु., सवादे येथील बाबा महाराज व गाडेवाट काँक्रिटीकरण साठी १० लाख रु., मातंग वस्ती लागत बालोद्यान सुशोभीकरण साठी १० लाख रु. हायमास्क लॅम्प साठी ३ लाख रु., स्मशानभूमी काँक्रिटीकरण साठी १० लाख रु., स्मशानभूमी साठी संरक्षक भिंत व शेड साठी १० लाख रु., तसेच जि प सदस्य उदयसिंह पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून गावातील अंतर्गत गटार काँक्रिटीकरण साठी ४ लाख रु., जि प सदस्या मंगलाताई गलांडे यांच्या स्थानिक विकास निधीतून मातंग वस्ती सभा मंडप साठी ७ लाख रु., पं स सदस्य काशिनाथ कारंडे यांच्या स्थानिक विकास निधीतून ग्रामपंचायत कार्यालयाजवळ वॉटर एटीएम मशीन बसविण्यासाठी २ लाख रु. असे एकूण ८६ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या व जि प सदस्य उदयसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जि प सदस्य उदयसिंह पाटील म्हणाले कि, विकास हाच काँग्रेस पक्षाचा ध्यास आहे. हे आधीच्या लोकप्रतिनिधींनी व आताच्या लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून दिसत आहे. लोकप्रतिनिधी सक्षम असल्यामुळेच आपल्या भागात विकासाची गंगा वाहत आहे. यामुळे गावाच्या विकासासाठी लोकांनी मतभेद सोडून एकत्र आले पाहिजे तरच गावचा विकास साधता येईल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय नांगरे यांनी केले. आभार कराड दक्षिण काँग्रेसचे उपाध्यक्ष नितीन थोरात यांनी मानले.

Leave a Comment