‘काँग्रेस आमदारांनो, उद्या बॅग भरून मुंबईत या’; घोडेबाजार रोखण्यासाठी वरिष्ठांकडून आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून महाविकास आघाडी सरकारला टक्कर देण्यासाठी रणनीती आखली जात आहे. निवडणूक बिनविरोध न झाल्यामुळे आता या निवडणुकीतही घोडेबाजार होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसही सतर्क झाले असून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत आपल्या बॅगा घेऊन येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. दरम्यान महा विकास आघाडीच्या बैठकीपूर्वीच काँग्रेसने आपल्या आमदारांना मुंबईत बोलवले आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडूनही सहाव्या जागेवरून धनंजय महाडिक तर शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. काँग्रेसकडूनही त्याचे उमेदवार निवडणुकीत उतरवण्यात आलेले आहेत. काँग्रेससह शिवसेना व राष्ट्रवादी, भाजपकडे साधारण 30 च्या आसपास मते आहेत.

त्यामुळे उर्वरित 12 मते मिळवण्यासाठी अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आमदार फुटू नयेत म्हणून ज्या त्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या आमदारांना बॅगा घेऊन मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment