टाळेबंदीला काँग्रेसचा विरोध नाही : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan
Prithviraj Chavan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राज्यात सध्या लवकरच लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. यापार्श्वभूमीवर टाळेबंदी हा विषय राजकिय नाही, त्याच राजकारण करून नये. एखाद्या उच्च वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन हा विषय घेतला पाहिजे. लोकांचे जीव वाचवण्याकरिता काही उपाय योजना केल्या पाहिजेत, हा विषय पॉलिटिकली नाही. परंतु डॉक्टरानी सांगितले. टाळेबंदी केली पाहिजे, तर करावीच लागेल असे म्हणत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेस लोकडाऊनच्या विरोधात नाही हेच एका अर्थी चव्हाण यांनी स्पष्ट केले.

सचिन वाझे प्रकरणावरून शरद पवार यांच्या पोटात दुखायला लागले आहे असा आरोप भाजप आयटी सेलचे प्रमुख नवीन कुमार यांनी केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजपाचा महाराष्ट्रात सत्ता तर करायचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न चालू आहे. अजून चार वर्षे तो खेळ करायचा आहे, परंतु त्यात त्यांना यश येणार नाही. राज्य सरकारला काही होणार नाही, तीन पक्षाचे सरकार स्थिर सरकार आहे. आमच्याकडे संख्याबळ भरपूर आहे, आता कर्नाटक मॉडेल, मध्यप्रदेश मॉडेल, लोकांना पैसे देऊन फोडायचे प्रयत्न त्यांचे चालू आहेत. परंतु महाराष्ट्रात ते यामध्ये यशस्वी होणार नाहीत असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/287264502760008

काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केले नसल्याचे या प्रश्नावर
मला काही कल्पना नाही. मात्र आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आमच्या शुभेच्छा त्यांच्याबरोबरच आहेत. इतराकडुन शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस नक्कीच झाली असेल, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली