काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा आहे – नाना पटोले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जावून काँग्रेसचा विचार पोहचवला पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेऊन कामाला लागा. बुथ कमिट्या अधिक सक्षम करा, समोर कितीही ताकदीचा उमेदवार असली तरी विजय निश्चित आहे, असे आवाहन प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

यवतमाळ व चंद्रपुर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे आज पार पडली. या बैठकीला प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, नसीम खान, आ. कुणाल पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अनेक कल्याणकारी योजना राबिवण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबिवली. अवकाळीचे नुकसान होताच १० हजार कोटी रुपयांची मदत दिली. मागील भाजपा सरकारपेक्षा जास्त मदत अवघ्या एका वर्षात केली आहे. सरकारने केलेल्या कामाची, विविध योजनांची माहिती गावा-गावात पोहोचवण्याचे काम करा.

ते पुढे म्हणाले, काँग्रेस पक्ष हा सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन त्यांच्या विकासासाठी कट्टीबद्ध असलेला पक्ष आहे. काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा आहे. देशभरातून नरेंद्र मोदीची हवा आता संपली असून काँग्रेसला अनुकुल वातावरण आहे. नागपूरचा ५५ वर्षांचा भाजपाचा बालेकिल्लाही विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने खेचून आणला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like